
पेण, ता. 8 (वार्ताहर) : पेण तालुक्यातील हमरापुर गावात छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती तिथीप्रमाणे मोठया उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली.शिवप्रेमी सेवा संघ हमरापुर व ग्रामस्थ मंडळ हमरापुर यांच्यातर्फे गेले 22 वर्ष गावात दोन दिवस छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषाने उत्साहात साजरी केली जाते.
यावर्षीही गुरुवारी किल्ले रायगड ते हमरापूर अशी शिवज्योत आणण्यासाठी शिवप्रेमी सेवा संघाचे व गावातील अनेक तरुण रायगडकडे रवाना झाले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी शिवज्योत गावात आणण्यात आली. त्यात गावातील अनेक तरुण व तरुणी सहभागी झाले होते.त्यानंतर रात्री गावातून सहवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यात सरपंच राकेश दाभाडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शिवप्रेमी सेवा संघाचे अध्यक्ष अक्षय दाभाडे, उपाध्यक्ष पप्पू नाईक, तंटामुक्ती संघटनेचे अध्यक्ष विश्वास पाटील, अशोक एरंडे, चंद्रकांत भगत, कृष्णा गोळीमडे, बबन चव्हाण, विनोद नाईक, संदेश कदम, सचिन गोळीमडे, सचिन शेलार, प्रकाश गणपत भगत, दिनेश पाटील, सुरेश एनपुरे, सुधीर गोळीमडे, प्रकाश पांडुरंग भगत यांच्यासह गावातील महिला, तरुण, तरुणी मोठया संख्येने सामील झाले होते.
शनिवार दि. 7 मार्च रोजी दुपारी श्री सत्यनारायणाची महापूजा ठेवण्यात आली होती.यानिमित्त महाप्रसाद ठेवण्यात आला होता.गावातील ग्रामस्थांनी त्याचा लाभ घेतला.तर रात्री घनसोली येथील स्वरगर्जना शाहिरी पथकाचे युवा शाहीर अभिषेक पाटील आणि सहकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर सुरेख पोवाडा सादर केला यावेळी ” छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय या घोषणांनी शाळे जवळील परिसर दणाणून गेला. तरुण, तरुणी, स्त्रीयानां फारच गहिवरून आल्याचे पहायला मिळाले.
सेवा संघ व ग्रामस्थ मंडळ हमरापुर तसेच महिला मंडळ यांच्या सहकार्याने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.




Be First to Comment