सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । 🔷🔶🔷
रोहा तालुक्यातील वाशी ग्रा.पं.वतीने आरोग्य कर्मचारी,शिक्षक वृंद,ग्राम पंचायत कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये प्रभावीपणे व कार्य तत्परतेने सेवा देणाऱ्या कोरोना योध्दांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू संसर्ग हा साथीचा आजार घोषित केल्याने त्याचे वाढते प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न पूर्वक खबरदारी घ्यायच्या उपाय योजना व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गावोगावी आणि घरोघरी जाऊन शासनाने घालून दिलेल्या प्रचलित नियमांचे काटेकोरपणे पालन करणे कामी तसेच निर्जंतुकीकरण,धूर फवारणी,प्रतिकार शक्ती वाढविण्याच्या दृष्टीने आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप करण्यात आल्या. तसेच “माझं कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेची प्रभावी पणे अंमलबजावणी करण्यासाठी घरोघरी जात प्रत्येक कुटुंबाच्या सदस्यांची आरोग्य तपासणी,तापमान तपासणी करणाऱ्या ग्राम पंचायत कर्मचारी सहादेव बर्डे सह ,अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका,मदतनीस आदी ११ कोरोना योद्धांना ग्राम पंचायत वाशी च्या वतीने सन्मान पत्रक बहाल करून यथोचित सन्मान करण्यात आला आहे.
यावेळी उपसरपंच सोनू शिद, सदस्य अरविंद मगर, सदस्या वंदना सुतार ,प्रियंका टेम्बे ,कविता शिंदे,विश्वजीत शिंदे ,ग्राम सेविका अर्चना पाटील अंगणवाडी सेविका सानिका बामणे अंगणवाडी मदतनीस संध्या जोगडे, आशा सेविका प्रज्ञा लहाने, ग्राम पंचायत लेखनिक स्वप्नाली भगत, ग्राम पंचायत कर्मचारी सहादेव बर्डे आदी ग्राम पंचायत हद्दीतील विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर सरपंच सतीश भगत यांनी मनोगत व्यक्त करताना कोरोना महामारी चे प्रमाण जरी कमी दिसून येत असले तरी नाका – तोंडाला मास्क वापरणे,सामाजिक आंतरता बाळगणे,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे,वारंवार साबणाने हात स्वच्छ धुणे आदी खबरदारीचे उपाय म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यावी, “खबरदारी हीच आपली जबाबदारी ” असे शेवटी सांगितले.








Be First to Comment