★ दोघांचा मृत्यू तर चार जण जखमी 🔶🔶
★ दोन कंपन्या जळून खाक 🔷🔷
★ मोठी वित्तहानी 🔶🔶
★ अन्य आठ कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर अनेक कंपन्यांमध्ये किरकोळ नुकसान 🔷🔷
★ वीज यंत्रणेचे मोठे नुकसान अठवडाभर वीज सेवा पूर्ववत होणे कठीण 🔶🔶
★ परिसरातील लोकांमध्ये भितीचे वातावरण 🔷🔷
★ अग्निशमन दलाच्या१२ गाड्या घटनास्थळी दाखल 🔶🔶
★ पोलीस यंत्रणेसह सर्वच शासकीय यंत्रणांची हजेरी 🔷🔷
★ कंपनी नोंदणीकृत नसल्याचे समजते 🔶🔶
★ कंपनी मालक कोणाचेही फोन उचलत नसल्याने खोपोली पोलीस मालकाच्या निवास्थानी रवाना 🔷🔷
★ कंपनी मालकावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा :- पोलीस आयुक्त संजय मोहिते 🔶🔶
सिटी बेल लाइव्ह । खोपोली – प्रतिनिधी । संतोषी म्हात्रे । 🔶🔷🔶
खोपोली शहरा जवळील साजगाव येथील आरकोस इंडस्ट्रीयल इस्टेट औद्योगिक नगरीतील रसायनिक उत्पादन करणारी जसनोवा केमिकलमधील रिअॅक्टरचा मध्यरात्रीच्या सुमारास अचानकपणे स्फोट झाल्याने या कंपनी शेजारी राहत असलेली एक महिला व जवळच असलेल्या कंपनीत वाँचमन म्हणून नोकरीवर हजर असलेली एक व्यक्ती अश्या दोघांचा यात मृत्यू झाला आहे तर अन्य चार जण जखमी झाले आहेत.त्यांना खोपोली शहरातील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मध्यरात्री २.३० च्या दर्म्यान झालेला स्फोट इतका भयंकर होता की या स्फोटामुळे परिसरातील जवळपास ४ किमी अंतरा पर्यंत याचा धक्का जाणवला.या कंपनी जवळ असलेल्या अन्य आठ कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर अन्य अनेक कंपन्यांसह साजगाव मधील लोकांच्या घरांचे किरकोळ स्वरुपात नुकसान झाले आहे.
कंपनी मालकाला काल रात्री पासून खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी फोन करत आहेत अद्यापर्यंत त्यांनी कोणाचाही फोन उचलला नसल्याने पोलीस अधिक्षक रायगड अशोक दुधे यांनी खोपोली पोलिसांना तात्काळ त्याच्या निवस्थानी पाठवून असेल तसा त्याला हजर करण्याचे आदेश दिले आहेत तर आयुक्तांनी या कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे.
काल मध्यरात्री साजगाव येथील आर्कोस औद्योगिक नगरीतील रसायनिक उत्पादन करणारी लघू उद्योग जसनोवा केमिकलमधील रिअॅक्टरचा जोरादार स्फोट झाला.हा स्फोट इतका भयंकर होता की अक्षरशः कंपनीचा काहीच भाग जाग्यावर शिल्लक राहिलेला नाही. या कंपनीतील रिअॅक्टरचे तुकडे तुकडे होऊन हे तुकडे परिसरातील एक किमी अंतरापर्यंत पसरले आहेत. यातील एक तुकडा झाडावर आदळला असून त्यामुळे झाड अर्धेअधिक चिरले आहे यावरून स्फोटाची तिव्रता लक्षात येते.मिळालेल्या माहिवरून असे समजते की,या कंपनीत मध्यरात्री आग लागली ही आग कंपनी शेजारी राहत असलेल्या एका कुटुंबातील जोडप्याला समजली हे जोडपे आपल्या मुलांना घेऊन जीव वाचविण्यासाठी पळत होते.मात्र हे १०० मीटर अंतर जात नाहीत तो पर्यंत कंपनीत जोराचा स्फोट झाला आणि या स्फोटामुळे उडालेल्या रिअॅक्टरचा एक भाग पळत असलेल्या महिलेला लागला व ती जागीच ठार झाली. तिच्या कंबरेवर असलेल्या मुलीच्या नाकाला मार लागला असून सुदैवाने ती वाचली आहे. अन्य दोन मुलांना घेऊन तिचा पती पुढे निघून गेल्याने तो व मुले वाचली आहेत. तर या कंपनी जवळ असलेल्या कंपनीतील वाँचमनवर कंपनीची शेड पडल्याने तोही जागीच ठार झाला आहे.
कंपनीत झालेल्या स्फोटा नंतर परिसरात धुराचा लोट व डोळ्यांची चुरचुर सुरू झाली होती. त्यामुळे लोकांमध्ये काही काळ भितीचे वातावरण पसरले होते.तसेच अधुनमधून होणारे स्फोट भितीची शक्यता वर्तवित होते.या परिस्थितीत खोपोली पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह अपघातग्रस्त ग्रुपच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी मोठ्या धाडसाने लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने नियंत्रण मिळविले.
स्फोटाची तिव्रता इतकी भयंकर होती की,परिसरातील लोकांना अगोदर वाटले की भूकंपाचा धक्का बसला की काय?रात्रीच्या सुमारास बसलेल्या या धक्यांनी अनेकजण आपल्या अंथरुणातून उठून घराबाहेर पडले.नंतर त्यांना साजगाव येथील आरकोस इंडस्ट्रीयल इस्टेट औद्योगिक नगरीत आगीचा मोठा आगडोंब दिसला त्यामुळे सर्व लोक कंपनीच्या दिशेने धावत सुटले.खोपोली पोलिसांची रात्रीच्या पाळीतील गस्तीची गाडी तात्काळ घटनास्थळी पोहचल्याने तात्काळ अग्निशमन दलाशी संपर्क करून त्यांना तात्काळ पाचारण करण्यात आले.आगीच्या घटनेची माहिती मिळताच खोपोली नगरपरिषद, एचपीसीएल, रिलायन्स, उत्तम स्टील , टाटा स्टील, कर्जत नगरपरिषद आणि पेण नगरपरिषदेच्या अश्या एकूण १२ फायर ब्रिगेड टीमने चार तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियत्रंण मिळविले.
स्फोटाची माहिती मिळताच खालापूर उपविभागीय अधिकारी सजंय शुक्ला, खोपोली पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर, सह पो. नि. असवरे, पीएसआय वळसंग, पीएसआय किसवे यांच्यासह खालापूर आणि खोपोली पोलीस ठाण्यातील अनेक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.सकाळी खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार,उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर, पोलीस अधिक्षक अशोक दुधे,पोलीस आयुक्त संजय मोहिते,स्थानिक आमदार महेंद्रशेठ थोरवे,प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, वीज मंडळाचे अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील,शिवसेना खोपोली शहरप्रमुख सुनिल पाटील, आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, मनिष खवळे,दिपेश मोरे,भाऊ गायकवाड, शशिकांत देशमुख, संजय देशमुख आदी अन्य मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली.








Be First to Comment