गुटखा प्रकरणात तुपगाव उपसरपंच महेश परिट सह दोघेजण फरार : पोलीस मागावर 🔶🔷🔶
उपसरपंचाच्या फार्महाऊसवर सापडला सहा लाखाचा विमल गुटखा 🔷🔷🔷
सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । 🔷🔶🔷
तालुक्यातील तुपगाव येथील सहा लाख गुटखा कारवाई प्रकरणातील आरोपी तुपगाव ग्रामपंचायत उपसरपंच महेश परिट,गौतम उर्फ गोट्या ओसवाल (रा.चौक) आणि महेश ठकेकर पाच दिवसापासून फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
तालुक्यात नव्याने उपविभागिय पोलीस अधिकारी म्हणून रूजू झालेले संजय शुक्ला यानी बेकायदा धंद्याचे कंबरङे मोङण्याचा चंग बांधला आहे. आठवङ्यापूर्वी चौक हद्दीत तुपगाव उपसरपंच महेश परिट याच्या फार्महाऊसवर पोलीस पथकानी छापा टाकत सहा लाखाचा विमल गुटखा जप्त केला होता.पोलीसानी मंदार नारायण चौधरी(वय22रा.चौक ) ताब्यात घेतले होते.
मंदारचा साथीदार महेश ठकेकर,महेश परिट आणि गौतम ओसवाल घटनेनंतर फरार झाले आहेत. मंदार सध्या न्यायालयीन कोठङीत असून लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणारे महेश परिट आणि त्याचे साथीदार पोलीसांचा ससेमिरा चुकवत फिरत आहेत.







Be First to Comment