Press "Enter" to skip to content

न्हावा-शेवा बंदरातून १४ कोटींची विदेशी सिगारेट जप्त

दुबईहून भारतात परदेशी सिगारेटची तस्करी 🔷🔶🔷

मुंबई सीमा शुल्क विभागाची कारवाई : सहा महिन्यातील तिसरी घटना 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । रायगड । धम्मशील सावंत । 🔷🔶🔷

न्हावा शेवा बंदरातुन मुंबई सीमा शुल्क विभागाने शनिवारी दुबईहून देशात तस्करी केली जात असलेल्या विदेशी सिगरेटचा साठा जप्त केला आहे. तस्करांनी सीमा शुल्क अधिकाऱ्यांना कळू नये म्हणून सिगारेट ॲल्युमिनियम कचरा आणि वाहन इंजिनच्या भागावर लपवून ठेवण्यात आले होते. तस्करीतुन आलेल्या सिगारेटची किंमत १४ कोटी रुपयांच्या घरात आहे.

या प्रकरणात अद्याप कोणाला अटक केलेली नसली तरी ही सहा महिन्यातील तिसरी घटना आहे. त्यामुळे नाव्हा शेवा बंदर हे पुन्हा तस्करचा अड्डा बनत चालला आहे.

उत्तर प्रदेशमधील माफिया टोळीमार्फत दुबईहून भारतात परदेशी सिगारेटची तस्करी होणार असल्याची माहिती मुंबई डीआरआयच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना खबऱ्यांकडून मिळाली होती. विश्वसनीय खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर न्हावा-शेवा बंदरात दुबईहून आलेल्या जहाजातील संशयित कंटेनर सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला. कंटेनरची कसुन तपासणी केली असता विदेशी सिगारेट लपविण्याच्या तस्करांच्या युक्तीने अधिकारीही अवाक झाले.

दुबईहून आलेल्या जहाजातील संशयित कंटेनर मधून अल्युमिनियम भंगार आणि इंजिनचे स्पेअर पार्ट आणले होते. या भंगारात आणि स्पेअर पार्टच्या भागावर विदेशी सिगारेट युक्तीने लपविले होते. सीमाशुल्क अधिनियम १६२ च्या तरतुदीनुसार सिगारेटचा साठा सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र लवकरच आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती सीमा शुल्क सुत्रांनी दिली आहे.

सहा महिन्यात तिसरी घटना

न्हावा शेवा बंदरातून मागील सहा महिन्यांतील ही तिसरी घटना आहे. तीन-चार महिन्यांपूर्वी दुबईतुन आयात करण्यात आलेला १२ कोटी किंमतीच्या सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला होता. या घटनेमुळे न्हावा शेवा बंदर हे तस्करांचा अड्डा होऊ लागला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.