सिटी बेल लाइव्ह । राजेश बाष्टे । अलिबाग । 🔷🔶🔷
अलिबाग शहरात अजंटा कॅटामरान सर्व्हीसेसच्या बसने एका पादचार्याला चिरडले. या अपघातात अपघातग्रस्त इसमाचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना आज (2 नोव्हेंबर) दुपारी बारा ते सव्वा बारा वाजण्याच्या दरम्यान घडली. अजंटा कॅटामरान सर्व्हीसेसची दुपारी बारा वाजताची प्रवाशांना घेऊन जाणारी बस मांडव्याच्या दिशेने निघाली. मात्र काही अंतरावर असलेल्या पीएनपी नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यानजीक या बसने एका पादचार्याला धडक दिली.
बसचे चाक पादचार्याचा डोक्यावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली होती. अलिबाग पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, मृत इसमाचे नाव अद्याप समजले नसून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.








Be First to Comment