सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । 🔷🔶🔷
तुपगाव येथील फार्म हाऊसवर धाङ टाकत खालापूर पोलीसानी प्रतिबंधित असलेला जवळपास सहा लाख रूपये किंमतीचा गुटखा जप्त केला असून मंदार नारायण चौधरी (वय22रा.चौक) याला ताब्यात घेतले आहे.त्याचा साथीदार महेश ठकेकर याचा पोलीस शोध घेत आहेत.
खब-या मार्फत खालापूर पोलीस निरिक्षक विश्वजीत काईंगङे याना चौक नजीक तुपगाव येथील महेश परिट यांच्या फार्महाऊसवर गुटखा साठा असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार ऊपविभागिय पोलीस अधिकारी संजय शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरिक्षक अंबिका अंधारे,पोलीस नाईक नितिन शेङगे,सचिन व्हसकोटी,हेमंत कोकाटे,पोलीस शिपाई दत्ता किसवे यानी महेश परिट यांच्या फार्महाऊसवर छापा टाकला.त्यावेळी विमल नावाचा प्रतिबंधित गुटखा पोत्यात भरून ठेवलेला आढळून आला.
जप्त मालाचा पंचनामा केला असता 5लाख 94हजार 880रूपये किंमतीचा गुटखा असल्याचे उघङ झाले.मंदार चौधरी याने शासनाची बंदि असताना देखील आर्थिक फायदा करून घेण्याच्या उद्देशाने सदर मालामध्ये भेसळ करून तो विक्री केला व काही माल विक्री करणेकरिता ताब्यात ठेवला या आरोपाखाली पोलीसानी मंदारला ताब्यात घेतले असून त्याचा साथीदार महेश ठकेकरचा पोलीस शोध घेत आहेत.
याबाबत खालापुर पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.कलम 328,272, 273 अन्न भेसळ प्रतीबंधक अधिनियम 1954 चे कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि संजय बांगर हे करीत आहेत.








Be First to Comment