दारू विक्रीची केस न करण्यासाठी मागीतली लाच : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतले ताब्यात 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । 🔶🔷🔶
तक्रारदारांच्या काकीवर दारूविक्रीची केस न करण्यासाठी दोन महिन्यांचे मिळून पैशाची लाच मागणाऱ्या तळोजा पोलिस ठाण्याचा पोलिस नाईक विनोद चौधरी याला ठाणेलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
तळोजा हद्दीत दारू विक्रीची केस न करण्यासाठी दोन महिन्यांचे दरमहा 6 हजार प्रमाणे 12 हजार रूपये झाले असता तडजोडी अंती 3 महिन्यांचे तीन हजार प्रमाणे 9 हजार रूपयांची मागणी केली.
याबाबत तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार केल्यानंतर पोलिस निरिक्षक सचिन कुंभार, पो.ना. जगताप, पोना सानप, पोना संदेश शिंदे, मपोना जाधव, चापोहवा चौधरी आदींच्या पथकाने सापळा रचून आरोपी पोलिस नाईक विनोदकुमार गौतमराव चौधरी याला लाच स्विकारल्याप्रकरणीताब्यात घेतले आहे.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केली असता तात्काळलाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधावा.








Be First to Comment