सुदैवाने दोघेही टूव्हीलर स्वार थोडक्यात बचावले 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔷🔶🔷
मुंबई-गोवा महामार्ग जवळ सुकेळी खिंडीच्या पायथ्याशी मोकाट गुरांच्या झुडींमूळे टूव्हिलरला अपघात होऊन एकाच टूव्हिलर वर दोघेजण प्रवास करणारे प्रवासी रस्त्यावर पडले परंतु सुदैवाने दोघेही बालाबाल बचावले. सविस्तर वृत्त असे कि मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीच्या वळनावर सोमवार दि.२६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वा.सुमारास या वळनावर उनाड गुरे रस्त्यात उभी होती.अचानकपणे या गुरांच्यात झोम्बी झाली.या दरम्यान कोलाड कडून नागोठणेकडे जाणाऱ्या गाडी न. MH.०२ BV.२२४५ या गाडीला या गुरांनी धडक दिली यामुळे दोघेही टूव्हिलर स्वार खाली पडले यामुळे एका टूव्हिलर स्वाराच्या हाताला किरकोळ जखम झाली.परंतु दोघेही बालाबाल बचावले आहेत.
या मार्गावर मोठ्या प्रमाणात मोकाट गुरांचे प्रमाण वाढले असून याकडे संबंधित व्यक्तीकडून लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आपली शेती मुंबई दिल्ली येथील धनिकांना विकल्या असून ९ ते १०वर्षात जमिनी विकण्याचा व्यवसाय जोमाने झाला आहे यातच आपल्याकडील शेती विकणाऱ्या शेतकऱ्यांची बिनकामी गोरे मोकाट सोडलेले आहेत तर जमिनी विकत घेतलेल्या मालकांनी सर्व शेती भोवती तारेचे कुंपण घातले आहे त्यामुळे शेती विकलेल्या शेतकऱ्यांची गुरे चारण्यासाठी जागा राहिली नसल्याने शेतकऱ्यांची ही गुरे मोकाट सोडले असून हि गुरे मुंबई-गोवा मार्गावर रस्त्याच्या मधोमध उभी राहून जणू प्रवाश्यांच्या जिवावर उठत आहेत. या विषयी वृत्तपत्रातून अनेक वेळा बातम्याही दिल्या परंतू याचा काहीही परिणाम झाला नाही.
शेतकऱ्यांनी मोकाट सोडलेली गुरे दररोज सुकेळी खिंडीच्या पायथ्या जवळील वळणावरील झाडाखाली रस्त्यात उभी राहत असल्याने हि गुरे प्रचंड वळणामूळे वाहन चालकाला त्वरीत लक्षात येत नाही त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असुन वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.व मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.यातच गुरांना अपघात झाला तर शेतकरी भरपाई मिळण्यासाठी धावत येतो परंतु त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांचा अपघात झाला तर शेतकरी जवळ येत नाही अशा मोकाट गुरांचा बंदोबस्त संबंधितांकडून करण्यात यावा.







Be First to Comment