सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । 🔷🔶🔷
तालुक्यातील देवद येथे ग्रामपंचायत कार्यालयाला आज पहाटे अचानकपणे आग लागल्याने आगीत मोठ्या प्रमाणात शासकीय दस्तावेज व इतर कागदपत्रे तसेच सामानसुमानाचे जळून नुकसान झाले आहे.

आज पहाटे चार, साडे चारच्या सुमारास अचानकपणेग्रामपंचायत कार्यालयाला आग लागली. आगीची माहिती मिळताच परिसरातील आग विझविण्यासाठी धाव घेतली. तसेच स्थानिक पोलिस व अग्निशमन दलाला याबाबत पाचारण करण्यात आले.

या आगीत मोठ्या प्रमाणात शासकीय दस्तावेज व इतर कागदपत्रे असे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नसून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.







Be First to Comment