सिटी बेल लाइव्ह । उरण । विट्ठल ममताबादे । 🔷🔶🔷
रसायनी, पनवेल, उरण येथील नागरिकांना सुचवण्यात येत आहे की फसवेगिरी पासून सावध रहा,असेच फसवेगिरी करणाऱ्या एका व्यक्तिस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मध्य रायगड जिल्हा संघटक रोजगार स्वयंरोजगार तथा खालापूर तालुका सचिव अभिजीत घरत व उरण तालुका उपाध्यक्ष राकेश भोईर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सैनिकांनी गोर गरीबांना फसविणा-या तरुणाला धडा शिकवला.
अरुण खेतमाली असे फसवेगीरी करणाऱ्या व्यक्तिचे नाव आहे.तो अहमदनगर येथील रहीवाशी आहे.सदर व्यक्ती लोकांकडून जातीचे दाखले काढून देतो असे सांगून पैसे काढून घ्यायचा.तसेच इतरही कामे करून देतो म्हणून सदर व्यक्तिने अनेका कडून पैसे उकळवले.अनेकांना फसविले या सर्व बाबी लक्षात घेता राकेश भोईर यांनी यावर त्वरित अँक्शन घेतली आणि त्या व्यक्तीस धडा शिकवला.
यावेळी मनसैनिक धनंजय दाभणे, विशाल निंबाळकर, प्रशांत मुंढे, अमित पाटील तसेच संग्राम कांबळे उपस्थित होते. सदर व्यक्ति उरण तालुक्यातील JNPT परिसरात फिरत असताना राकेश भोईर यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यामुळे त्या व्यक्तीला समज देउन पुन्हा असे कृत्य करणार नाही असे वदवुन घेतले.
सदर व्यक्तिने माफी मागून पुन्हा सामान्य लोकांची फसवणूक करणार नाही असा जबाब देत माफी मागितली.कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असल्याने सध्या चोरी, लूटमार, फसवणूक ,लैंगिक अत्याचार, खून आदि गुन्हयांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी आता अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.







Be First to Comment