सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । 🔷🔶🔷
एका बंद घरात अज्ञात चोरट्यांनी केलेल्या घरफोडीत सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केल्याची घटना पनवेल शहातील मिडल क्लास हौसिंग सोसायटीमध्ये घडली आहे.
शहरातील मिडल क्लास हौसिंग सोसायटीमधील आदित्य बिल्डींगमधील तिसरा मजला, रुम नं.303 हा शितल पोवळे (69) यांचा ब्लॉक असून तो बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी सेफ्टी लॉक कश्यातरी सहाय्याने तोडून आत प्रवेश करून बेडरुमच्या कपाटात असलेले सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून जवळपास 76 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला आहे.
याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून पनवेल शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे.








Be First to Comment