एकाच दिवसात तीन वेळा सुपर ओव्हर होणारा हा पहिलाच दिवस असेल. कोलकाता विरुद्ध हैद्राबाद सामन्यात देखील एक सुपर ओव्हर झाली होती. यानंतर मुंबई विरूद्ध पंजाब सामन्यात चक्क दोन वेळा सुपर ओव्हर झाली. दोन वेळा टाय झाल्यानंतर पंजाबच्या क्रिस गेलने सुपर ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूला षटकार मारून विजय आपल्याकडे खेचून आणला.
पंजाब आणि मुंबईत पहिली सुपर ओव्हर टाय झाल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये क्रिस गेलने सामना आपल्या संघाकडे खेचून आणला. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईने पाच धावा केल्या याचा पाठलाग करत किंग्स इलेव्हन पंजाब संघ देखील पोहोचला आणि ती सुपर ओव्हर टाय झाली. यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईने ११ धावा करून सामना रंजक केला.मात्र क्रिस गेलने आपल्या मेहनतीने खेळ खेचून आणला आणि दणदणीत विजय मिळवला.पंजाब आणि मुंबईतील हा सामना रोमांचक ठरला. पहिल्या सुपर ओव्हरनंतर सामना आणखीच रोमांचक ठरला. या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबच्या मयांक अग्रवालची देखील चर्चा झाली. चेंडू अडवण्यासाठी त्याने खेळलेली खेळी कौतुकास्पद होती.
सामन्यात प्रथम फलंदाजी करत मुंबईने 20 षटकांत 6 बाद 176 धावा केल्या. पंजाबचा संघही 20 षटकांत 6 षटकांत 176 धावा करू शकला. अखेरच्या षटकात पंजाबने विजयासाठी 9 धावा करायच्या होत्या, पण ख्रिस जॉर्डन अंतिम चेंडूवर धावबाद झाला आणि सामना सुपर ओव्हरपर्यंत पोहोचला.
आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा सुपर ओव्हरही टाय झाली.
दुसर्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने मुंबईला पराभूत केले. दोन्ही संघांनी पहिल्या सुपर षटकात 5-5 धावा केल्या. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईने पंजाबला 12 धावांचे लक्ष्य दिले. पंजाबने ख्रिस गेलच्या षटकाराने आणि मयंक अग्रवाल चौकारांनी जिंकला. यापूर्वी २०१४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळलेला सामना टाय झाला होता. त्यानंतर सुपर ओव्हरही टाय झाला. त्यावेळी दोन सुपर षटकांचा नियम नव्हता. राजस्थानने सुपर ओव्हरमध्ये अधिक चौकारांच्या जोरावर हा सामना जिंकला होता.
गेल्यावर्षी झालेल्या वर्ल्डकपच्या फायनलमध्येही असाच थरार न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये रंगला होता. ती फायनल सुद्धा दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गेली होती, तथापि ही ओव्हरसुद्धा टाय झाल्याने अधिक चौकारांच्या जोरावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले होते. न्यूझीलंडची झालेली निराशा त्यावेळी लपून राहिली नव्हती.
फर्ग्युसन ठरला मॅच विनर एलिमेंट
वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील पहिल्याच लढतीत धडाकेबाज कामगिरी केली. त्याने केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने शनिवारी झालेल्या लढतीत सनरायझर्स हैदराबादवर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला.
कोलकाता नाईट रायडर्सचा हा पाचवा विजय ठरला. त्यामुळे ओएन मॉर्गनच्या संघाला दहा गुणांची कमाई करता आली. लॉकी फर्ग्युसनने निर्धारित सामन्यांमध्ये 15 धावा देत तीन फलंदाजांना बाद केले. तसेच सुपर ओव्हरमध्ये अवघ्या 2 धावांमध्ये दोन फलंदाज बाद करीत कोलकाता नाईट रायडर्सला दिमाखदार विजय मिळवून दिला. कोलकाता नाईट रायडर्सच्या दिनेश कार्तिक व ओएन मॉर्गन या जोडीने सुपर ओव्हरमधील तीन धावांचे आव्हान चौथ्या चेंडूवर पूर्ण केले.
दुखापतीमुळे विल्यमसन सलामीला
केन विल्यमसनच्या पायाला दुखापत झाली होती. अशा परिस्थितीत मधल्या फळीत येऊन एकेरी-दुहेरी धावा काढताना अडचण निर्माण होऊ शकते हे लक्षात घेऊन सनरायझर्स हैदराबादने केन विल्यमसनला सलामीला पाठवले. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने मधल्या फळीत फलंदाजीला येणे पसंत केले. कोलकाता नाईट रायडर्सकडून मिळालेल्या 164 धावांचा पाठलाग करताना जॉनी बेअरस्टो (36 धावा), केन विल्यमसन (29 धावा) यांनी 58 धावांची भागीदारी करीत आश्वासक सुरुवात करून दिली.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन याचा पहिलाच सामना होता. त्याने केन विल्यमसनला नितीश राणाकरवी झेलबाद करीत सनरायझर्स हैदराबादला पहिला धक्का दिला. त्यानंतर प्रियम गर्ग (4 धावा) व मनीष पांडे (6 धावा) यांचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. वरुण चक्रवर्तीने जॉनी बेअरस्टोला बाद केले. संघ संकटात असताना डेव्हिड वॉर्नर (नाबाद 47 धावा) व अब्दुल समद (23 धावा) यांनी सनरायझर्स हैदराबादच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण आंद्रे रस्सेलच्या अखेरच्या षटकात विजयासाठी 18 धावांची आवश्यकता असताना 17 धावा करण्यात त्यांना यश लाभले. अखेर लढत बरोबरीत राहिली आणि निकालासाठी सुपर ओव्हरचा अवलंब करण्यात आला. दरम्यान, याआधी शुभमन गिल (36), ओएन मॉर्गन (34), दिनेश कार्तिक (नाबाद 29) यांच्या दमदार फलंदाजीमुळे कोलकाता नाईट रायडर्सला 163 धावा करता आल्या.
Be First to Comment