पोलादपूर कशेडी घाटात कारने घेतला पेट : भोगावजवळील घटना 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर । 🔶🔷🔶
तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरील कशेडी घाटामध्ये शनिवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पनवेल ते खेड दरम्यान प्रवासासाठी निघालेल्या जोडप्याची कार अचानक पेट घेऊन आगीच्या ज्वाळांमध्ये खाक झाली. सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही.
पनवेल येथील मसूद अहमद सिद्दीकी (वय 40) हे त्यांची पत्नी फौजिया हिच्यासमवेत पनवेल येथून हुण्डाई एक्सेंट कार (एमएच 46 एडी 5713) घेऊन रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पोलादपूर तालुक्यातील भोगाव गावाच्या हद्दीत कशेडी घाटामध्ये आले असता अचानक कारने पेट घेतल्याचे मसूद यांच्या लक्षात आले त्यामुळे त्यांनी रस्त्याच्या साईडपट्टीलगत कार उभी केली. यानंतर थोडया वेळेने कार आगीच्या ज्वाळाच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाली. सुदैवाने दोघा पती-पत्नींनी कारने पेट घेतल्याचे लक्षात येताच कारमधून बाहेर पडून सुरक्षित अंतरावर उभे राहण्याची समयसूचकता दाखविल्याने कोणासही इजा झाली नाही.
या घटनेची खबर पोलादपूर पोलीस ठाण्याला देण्यात आली असून पुढील तपासकार्य सुरू आहे.








Be First to Comment