सिटी बेल लाइव्ह । रायगड । राजेश कांबळे – धम्मशील सावंत । 🔷🔶🔷
रायगड जिल्ह्यातील पेण नगरिषदेमध्ये शुक्रवारी पालिकेच्या स्थायी समितीचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा सुरू असताना अनधिकृत बांधकाम धारक श्रीमती रंजना बांदिवडेकर यांना पेण पालिकेने नोटीस काढण्याचा राग मनात धरून सदर मीटिंग करिता हजर असणारे पेण नगर परिषदेचे गटनेते अनिरुद्ध पाटील यांनी मोठमोठ्याने आरडाओरड केली. त्याचप्रमाणे रागाच्या भरात दोन वेळा खुर्ची उचलून मुख्याधिकारी अर्चना दिवे यांना मारण्यासाठी धावत आले.
याप्रकरणी शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला म्हणून मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी गटनेते अनिरुद्ध पाटील यांच्या विरोधात पेण पोलीस ठाण्यात कलम 353,352,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







Be First to Comment