सिटी बेल लाइव्ह । नवी मुंबई । 🔶🔷🔶
नवी मुंबई आयुक्तालयातील रबाळे पोलीस ठाणे हद्दीतील बाळारामवाडी घणसोली येथील साई आशिर्वाद विलासिनि अपार्टमेन्ट या मध्ये राहणारा अल्पवयीन मुलगा ओमकार शंकर साठे वय -०४ वर्षे , हा दिनांक १८ / ० ९ / २०२० रोजी दुपारी ०१:०० वा . सुमारास राहत्या इमारतीच्या पहिल्या माळ्यावरील ७ ते ८ मिनिटामध्ये हरविलेला होता . त्यानंतर २ तासांनी ओमकार याचा मृतदेह हा तो राहत असलेल्या इमातरीच्या पाठीमागे एका सुतळी गोणीमध्ये मिळून आला होता .

त्याबाबत रबाळे पोलीस ठाणे येथे गु . रजि नंबर २६३/२०२० , भादवि कलम ३०२ , ३६३ , २०१ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता . नमुद गुन्याचा तपास रबाळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे गिरीधर गोरे यांनी पोलीस आयुक्त नवी मुंबई , सह पोलीस आयुक्त डॉ . जय जाधव , पोलीस उप आयुक्त परिमंडळ -०१ सुरेश मेंगडे , सहा पोलीस आयुक्त वाशी विभाग विनायक आ . वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली केला .
गुन्हयाच्या घटनास्थळी मिळून आलेले परिस्थतीजन्य पुरावे , तपासा दरम्यानाचे भौतिक पुरावे , गुन्ह्याचा वेळेचा तपशिल , मयत मुलाच्या सवयी यांचा तपासा दरम्यान सखोल अभ्यास केला . इमातरीमधील इतर सर्व रूमची झडती घेतल्यानंतर तेथे मिळुन आलेल्या संशयीत वस्तुवरून गुन्हयातील मयत मुलगा ओमकार यांच्या शेजारीच राहणा – या १७ वर्षाच्या अल्पवयी मुली बाबत संशय निर्माण झाला होता .
सर्व तांत्रिक बाबी , भौतिक पुरावे , परिस्थितीजन्य पुरावे हे देखील नमुद अल्पवयीन मुलीचाच गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे दर्शवित होते . परंतु नमुद अल्पवयीन मुलगी तपास यंत्रणेस कोणती ही माहिती देत नव्हती . सहा . पोलीस आयुक्त वाशी विभाग विनायक आ . वस्त यांनी पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे , उमेश गवळी यांच्या मदतीने संशयीत अल्पवयीन मुलीकडे सदरचा गुन्हा घडल्यापासुन २३ दिवस नियमितपणे अतिशय संयमपुर्ण , वेगवेगळ्या भावनीकस्तरावर , कौशल्यपुर्ण चौकशी करून तीचा अधिक – अधिक विश्वास संपादन केला . वेग – वेगळ्या युक्तीपुर्ण केलेल्या चौकशी मधुन नमुद अल्पवयीन मुलीने तीच्या आई – वडिल व वकिल यांच्या समक्ष सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे .

अल्पवयीन मुलगी व गुन्हयातील मयत मुलगा ओमकार हे शेजारीच राहत असल्याने ओमकार हा नमुद अल्पवयीन मुली व्यतिरिक्त कोणाकडे ही खेळण्यास जात नसे . दिनांक १८ / ० ९ / २०२० रोजी दुपारी ०१:०० वा.सुमारास गुन्हयातील मयत ओमकार हा तळमजल्यावर खेळून तो अल्पवयीन मुलीच्या घरामध्ये गेला होता . त्या वेळी काही प्रंसग उद्भवुन तो बेशुध्द झाला . त्यावेळी अल्पवयीन मुलीने घाबरून घरातील एका सुतळी गोणीमध्ये ओमकार यास टाकुन ती गोणी तीने तिच्या घराच्या मागील बाजुस असलेल्या खिडकी मधुन इमारतीच्या पाठीमागे खाली फेकुन दिली . ओमकार हा सुतळी गोणीमध्ये राहिल्याने त्याचा श्वास गुदमरून मृत्यु झाला आहे . ही अल्पवयीन मुलगी ओमकार याच्या मृत्युस कारणीभुत ठरली आहे . या अल्पवयीन मुलीस सदर गुन्हयामध्ये तिचा सहभाग निष्पन्न झाल्याने ताब्यात घेवुन बाल न्यायमंडळ , भिवंडी येथे हजर केले असता , या मुलीस अभिरक्षणा बालगृहामध्ये ठेवण्यात आले आहे .







Be First to Comment