सिटी बेल लाइव्ह । पेण । राजेश कांबळे । 🔷🔶🔷
रायगड जिल्ह्याच्या पोलिस कार्यक्षेत्रातील वाहन चालकांनी वाहन चालवितांना खबरदारी घ्यावी या करीता लवकरच वाहतूक शाखेच्या वतीने विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
रस्त्यावर विना हेल्मेट वाहन चालवित असल्यामुळे अनेकांचे अपघात होऊन मृत्युमुखी पडले आहेत त्यामुळे एखाद्या घरातील कर्ता पुरुष गेला तर त्याची उणीव कधीच भरून येत नाही म्हणून वाहन चालविणाऱ्यांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, दुचाकी स्वरांनी हेल्मेटचा वापर करावा, कोणीही ट्रिपलसिट घेऊन वाहन चालवू नये, देशात कोरोनाने हाहाकार उडविला असल्याने कोविड 19 मुळे नेहमी नागरीकांनी सामाजिक अतंर ठेवावे या सर्व बाबींचे वाहन धारकांनी पालन करावे अन्यथा त्याच्यांवर मोटार वाहन कायदा कलम 129/177 प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा वाहतूक पोलिस शाखेच्या वतीने देण्यात आला आहे.







Be First to Comment