सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । 🔶🔷🔶
बेकायदेशीररित्या खवल्या मांजरांच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या 5 जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून पनवेल व अलिबाग वनविभागाच्या पथकाने पकडले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खवले मांजरांची खवले हस्तगत केले आहेत.
खवल्या मांजरांच्या खवल्यांची तस्करी होणार असल्याची माहितीअशिष ठाकरे, (मा.उपवनसंरक्षक, अलिबाग) यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली डी.एस. सोनवणे. सहा. वनसंरक्षकाप्रादेशिक व वन्यजीव) पनवेल, पी.बी. मरले, वनक्षेत्रपाल (संरक्षण अतिक्रमण निर्मुलन), पनवेल व वनकर्मचारी यांचे समवेत मुंबई-गोवा महामार्गावरील मौजे-चिंचवण गावाचे हददीत असलेल्या क्षणभर विश्रांती हॉटेलजवळ सापळा रचून थांबले असता दोन मोटरसायकलवरून आरोपी ज्ञानेश्वर मधुकर शिवकर, रा.खारपाले व आरोपी प्रविण बबन जाधव रा.उंबर्ले तसेच आरोपी प्रतिश सुभाष भोस्लेकर, रा.मुर है वरील जागेवर आले.
आरोपी ज्ञानेश्वर मधुकर शिवकर व प्रविण बबन जाधव है टिव्हीएस कंपनीची जुपिटर मोटरसायकल क्र MH 05 / Dx – 5808 बसलेले मोटरसायकलवर पुढे एक लाल रंगाची पिशवी तसेच एक पांढ-या रंगाची पिशवीमध्ये काहीतरी घेऊन आलेले होते. तर दुस-या हॉझ कंपनीची मोटरसायकल क्र. MH 06 / BY – 0406 आरोपी प्रतिश सुभाष भोस्लेकर आलेला दिसला.
दरम्यान ते एकमेकांच्या पिशव्या आदलाबदल करत असताना वनविभागाच्या पथकाने सापळा रचून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघेजण त्यांच्या हाती सापडले तर एक जण पळून जात असताना पाठलाग करून त्याला पकडले असता त्यांच्याकडे प्राणी खवले मांजर (Pongolin) Family – Maris Crassicaudata या वन्यप्राण्याचे खवले असल्याचे दिसून आले असता ते जप्त केले. सदरच्या आरोपी विरुध्द अन्वये भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 09,39,44 (1) अ 48 अ. 494, 50 (9), 51, 52 नुसार गुन्हा नोंद केला. सदर आरोपींची चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सौरभ सुरेश पाटील रा.खारपाले व आरोपी किरण गोविंद पवार रा.कळद यांची माहिती दिली. त्यानुसार सहा. वनसंरक्षक, अलिबाग व वनक्षेत्रपाल (संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन), अलिबाग तसेच स्थानिक वडखळ वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी यांनी त्याचे राहत्या घरी जाऊन ताब्यात घेतले व त्यांनी दिलेल्या माहितीनुसार खवले मांजर या वन्यप्राण्याचे खवल्यांची भरलेली बॅग ज्या ठिकाणी टाकली होती ती जागा दाखवली सदर ठिकाणावरुन 3 किलो खवले मांजर वन्यप्राण्याचे खवले मिळून आले.
तेसुद्धा ताब्यात घेतले असून सदर आरोपिंना मा. प्रथम वर्ग न्यायालय, पनवेल यांचे न्यायालयात हजर केले असता मा.न्यायायलाने त्यांना दि .15.10.2020 पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली. सदर गुन्हयांचा पुढील तपास चालू आहे.
Be First to Comment