सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । 🔷🔶🔷
महिलेवर वाईट नजर ठेवून तिचा पाठलाग करणा-या सावरोली गावातील इसमा विरोधात महिलेनी तक्रार दिली असून खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीङीत महिला हि धामणी गावात राहणारी असून सारसन येथील क्युरलामेंट कारखान्यात कामाला जाते.आरोपी इसम हा दोन दिवसापूर्वी गेटवर येवुन त्याने तेथील सुरक्षारक्षकाला तो पीङीत महिलेचा मावस भाऊ असून तिला भेटायचे आहे असे सांगितले.त्यामुळे सुरक्षा रक्षकाने महिलेला गेटवर बोलावून घेतले.आरोपीने महिलेला मला तुझे सोबत बोलायचे आहे. तु माझे बरोबर चल, माझी गाडी आहे, गाडीतुन जाऊ असे म्हणाला.
त्यावेळी महिलेनी मी तुला ओळखत नाही.तुझे बरोबर येवु शकत नाही असे उत्तर दिले.आरोपीने महिलेजवळ तिचा मोबाईल क्रमांक मागितला परंतु तिने दिला नाहि. आरोपीने महिलेला मी तुला दररोज तुझे घरासमोर भांडी घासताना, कपडे धुताना बघतो तु आता माझे सोबत माझे गाडीतुन चल,मला तुला काही सांगायचे आहे असा हट्ट धरला.बोलत असताना तो वाईट नजरेने पाहत असल्याचे महिलेला जाणवले.
त्यामुळे घाबरलेल्या पीङीत महिलेनी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली आहे. याबाबत खोपोली पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महिला पोलीस हवालदार पाटील ह्या करीत आहेत.
Be First to Comment