सख्या…..
तुझ्या छत्र छायेत किती सुख आहे
तुझ्याविण जीवन सारे व्यर्थ आहे
तुझे रूप नित्य पूजिते मनी
तुझ्या आठवणीत येई डोळा पाणी
साथ तुझी असता मनी चांदणे फुलते
तुझ्या नामातच देहभान हरपते
विचारांचे मंथन करुनी नवनीत तुला अर्पिते
ओंजळीत सुख मिळवण्या मीच मला शोधते
सख्या तुझ्या इच्छेनेच हे विश्व चालते
तुझ्या माझ्यामधले अंतर क्षणात मिटून जाते.
सौ.संध्या करंदीकर…..






Be First to Comment