Press "Enter" to skip to content

पालीमध्ये माणुसकी ला काळीमा फासणारी घटना

पालीतील मजुरी करणाऱ्या अल्पवयीन आदिवासी मुलीवर ठेकेदाराने केला बलात्कार…! 🔶🔷🔶

पाली पोलीस स्थानकात ठेकेदारावर बलात्कार व ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । रायगड । धम्मशील सावंत । 💠🌟💠

पालीत राहणाऱ्या एका 16 वर्षीय मजुरी करणाऱ्या अल्पवयीन आदिवासी मुलीवर ठेकेदाराने बलात्कर व जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना आज समोर आली आहे.

याबाबत गुरुवारी (दि.8) रात्री साडेअकरा वाजता पाली पोलीस स्थानकात ठेकेदारविरोधात बलात्कार व ऍट्रोसिटीचा व इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

किरणकुमार सूर्यवंशी,
रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी

      या आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला सर्व चौकशी करून शुक्रवारी (दि.9) सायंकाळी अटक केली जाणार आहे. असे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी सांगितले.  या बाबत पाली पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार पीडित 16 वर्षीय आदिवासी मुलगी मूळ राहणार पाली, सध्या रा. चरी गावठाण, ता. डहाणू ही बिल्डिंग बांधकामावर मजुरीचे काम करत होती. तेथील ठेकेदार नितीन महादू पाटील (वय 34) मूळ राहणार पाली, सध्या रा. चरी गावठाण, ता. डहाणू याने 1 जानेवारी 2019 ते 6 ऑक्टोबर 2020 या कालावधीत पाली बल्लाळेश्वर मंदिरासमोरील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खोलीत आणि चरी गावठाण, ता. डहाणू जिल्हा पालघर येथे बलात्कार करून जातीवाचक शिवीगाळ केला आहे. आणि या संदर्भात कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. ही तक्रार पाली पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी दाखल करून घेतली. तर या संपूर्ण प्रकरणाचा तपास रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी करत आहेत. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.