Press "Enter" to skip to content

वन्यजीव सप्ताह निमित्ताने जिल्ह्यास्तरीय ऑनलाईन स्पर्धा

निबंध स्पर्धेत हेमाली म्हात्रे व चित्रकला स्पर्धेत तेजस म्हात्रे यांचे सुयश 🔷🔶🔷


सिटी बेल लाइव्ह । प्रतिनिधी ।कर्नाळा । 🔶🔷🔶

आपल्या जीवनात वनाचे महत्व मोठे आहे तसेच वन्यजीवांचे रक्षण हे तेवढेच महत्वाचे आहे. या साठी वन्यजीव रक्षक आटोकट प्रयत्न करीत असतात. परंतु ही जबाबदारी सर्वांनी घेतली तर ह्या वनात वन्यजीवांचे अस्तित्व टिकून राहील. या करिता 1ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या वनाजीव साप्ताहात महाराष्ट्र शासन ठाणे वन्यजीव विभागातर्फे घेण्यात आलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेत कोप्रोली ची स्पर्धेक हेमाली म्हात्रे हिने प्रथम क्रमांक मिळविला आहे.

रंजना संजय केणी (द्वितीय ),कृंचा धिरेंद्र ठाकूर ( त्रितीय),
उत्तेजनार्थउत्तेजनार्थ समीर शंकर म्हात्रे,
अंकुश नथुराम जाधव, सुनील अनंत पाटील, प्राजक्ता प्रकाश गोंधळी,
शुभम विलास राठोड तसेच चित्रकला स्पर्धेत तेजस म्हात्रे (प्रथम ),आशिष थळी (द्वितीय), प्रियांशु मिठागरी(त्रितीय) व उत्तेजनार्थ निलेश पाटील, अदिती पाटील, भूमी जुईकर मनोहर ठाकूर सौरभ देबनाथ सदर सर्व स्पर्धकांना या ट्रॉफी , प्रमाणात पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी उप वनरक्षक वन्यजीव विभाग ठाणे बी एन पिगळे, RFO चौहान, हरीश पाटील रावे, राजेश पाटील मोठेभोम, राजु मुंबईकर वेश्वी, अमोल आंबोलकर पनवेल, अजय मोकळ चिरनेर, नागेन्द्र म्हात्रे सारडे, स्नेहल पालकर वेश्वी, रूपेश गावंड चिंचपाडा, देवाण ठाकूर केलवने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.