सिटी बेल लाइव्ह । कळंबोली । प्रतिनिधी । 🔷🔶🔷
पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्र १ मधील घोट पिंपळपाडा गावातीलजीर्ण झालेले पोल व नादुरुस्त झालेल्या वायर नगरसेवक ज्ञानेश्वर सुरेश पाटील यांच्या प्रयत्नाने बदलण्यात येवून नवीन टाकण्यात येत आहेत. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेचे परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

गेली अनेक वर्षापासून घोट-पिंपळपाडा या गावातील पोल व वायर जीर्ण, नादुरुस्त झाले होते. त्यामुळे वायरसह पोल खाली येवून प्राण गमवावा लागेल या भितीने नागरिक वावरत होते. पेधर व तलोजा गावात जीर्ण झालेली वायर पडून नागरिकांना जीव गमवावे लागले होते त्याची पुनरावृत्ती होवू नये म्हणून नगरसेवक ज्ञानेश्वर सुरेश पाटील यांनी या गावात पोल व वायर बसविण्यासाठी सतत पाठपुरावा केला होता.
यात त्यांना दत्तात्रेय पाटील, प्रकाश निघुकर, वैभव भोईर, कु अक्षय पाटील यांचीही मदत मिळाली. त्याच्या प्रयत्नाना यश येवून घोट पिंपळपाडा गावात नवीन पोल व वायर बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे त्यामुळे नागरिकात आनंदाचे वातावरण पसरले आहे.








Be First to Comment