Press "Enter" to skip to content

दलित युथ पँथर्सचा आंदोलनाचा ईशारा !

कर्जत तालुक्यातील वंजारवाडी आदिवासीवाडीत पाण्यासाठी वणवण 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । भिसेगाव – कर्जत । सुभाष सोनावणे । 🔷🔶🔷

स्वातंत्र्य मिळून ८० च्या दशकाकडे आपण वाटचाल करत असतानाही आजही आदिवासीवाडी – पाड्यात पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना वणवण करावी लागत आहे . त्यामुळे खऱ्या अर्थाने यांना स्वातंत्र्य मिळाले आहे का ? असा प्रश्नचिन्ह उभे रहात असून येथील राज्यकर्त्यांच्या कार्यप्रणालीवर व बुजगावण्या सरकारी बाबूंच्या बेभरोशी कागदोपत्री कारभारावर संताप व्यक्त होत आहे .

कर्जत तालुक्यातील भालीवडी ग्रामपंचायत हद्दीतील वंजारवाडी या आदिवासी वाडीला गेले १० ते २० वर्षे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असून या पाण्यामुळे अवघी वाडी शिक्षण – आरोग्य – रोजगाराच्या चक्रव्यूहात फसलेली दिसत आहे .

पाण्यासाठी त्यांना करावा लागणारा संघर्ष व त्यासाठी ग्रामपंचायतीकडे केलेली वारंवार याचना याकडे आजपर्यंत दुर्लक्ष होत असून याविरोधात दलित युथ पँथर खुर्ची उबवणाऱ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारणार असून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा ईशारा निवेदनाच्या माध्यमातून कर्जत तहसिल कार्यालय व पंचायत समिती येथे दिला आहे .

कर्जत तालुक्यातील पंचायत समितीच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या भालीवडी ग्रामपंचायत हद्दीतील वंजारवाडी या आदिवासीवाडीत पाण्याची काहीच सोय नाही . पूर्वीपासून पेजनदीवरून येथील नागरिक पाण्याची ने – आण करतात , मात्र हे अंतर लांब असल्याने दीड – दोन किलोमीटर असलेल्या पाण्याच्या नाल्याच्या शेजारी डौरा खोदून त्यातून पाण्याची भांडी भरून नेली जातात .

मात्र हे करताना साडेतीनशे नागरिकांची वस्ती असलेली आदिवासी वाडीत पाणी भरण्यास सकाळची रात्र होते . यामुळे लहान मुलांना घेऊन पाणी भरण्याचे काम महिलांना करावे लागते मग कसली शाळा , कसला रोजगार , आणि कसले आरोग्य ? या दलदलीत सापडलेली ही वाडी आजच्या या आधुनिक आणि तंत्रज्ञान युगात किती मागे आहे , ही बाब संतापजनक व खेदजनक वाटते .

रात्रीच्या वेळी अपघात देखील घडलेले असताना याबाबतीत ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सरपंच , ग्रामसेवक यांना ही गंभीर समस्या सांगूनही याकडे प्रत्येक वेळी निवडून आलेली सरपंच सहित कमिटी व ग्रामसेवकांनी दुर्लक्ष केले आहे .

दलित युथ पँथरचे पदाधिकारी यांनी ही संतापजनक परिस्थिती बघून भालीवडी ग्रामपंचायतीच्या विरोधात दंड थोपटले असून आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी यासाठी रस्त्यावर उतरणार असून याविरोधात कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी , कर्जत तहसिलदार यांना निवेदन देऊन जाब विचारला आहे .

तसेच कर्जत पोलिस स्टेशन येथे भेट देऊन लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न सोडवण्यात यावा अन्यथा तिव्र आंदोलन छेडु , असा इशारा दलित युथ पँथर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रविण रोकडे ,पँथर सुशिल भाई जाधव,रोहिदास सोनवणे – कर्जत तालुका युवा उपाध्यक्ष , रोहित ढोले – कर्जत तालुका कार्याध्यक्ष , रोशन गोतारणे – कर्जत तालुका युवा अध्यक्ष , गणेश नाईक – कर्जत तालुका सरचिटणीस, अशोक रोकडे तसेच ईतर तालुका कार्यकारणी यावेळी उपस्थित होती .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.