सिटी बेल लाइव्ह । भिसेगाव – कर्जत । सुभाष सोनावणे । 🔷🔶🔷
कर्जत तालुक्यातील नागरिकांना तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी रक्ताची गरज भासल्यास त्यांना तात्काळ रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने रक्त साठा केंद्र कर्जत उपजिल्हा रुग्णालयात मंजूर केले आहे , मात्र अद्यापी हे केंद्र सुरू झाले नसल्याने रुग्णांची खूपच अडचण होत असल्याने ही रक्त पुरवठा गंभीर अडचण लक्षात घेऊन रक्त साठा केंद्र त्वरित चालू करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे .
सध्या शरीरात रक्त कमी असल्याचे अनेक रुग्णांची वाढ होत आहे . असे रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यावर त्यांना अलिबाग जिल्हा रुग्णालयात किंवा पनवेल , मुंबई येथे हलविण्यात येतात. त्यामुळे रुग्णांना पैशाअभावी तसेच प्रवासाचा नाहक त्रास होतो .शिवाय प्रवासात रुग्णांवर जीवावर बेतण्याची अघटित घटना घडू शकते . म्हणूनच ही सेवा कर्जत उपजिल्हा रुग्णालयात चालू करण्याची मागणी सातत्याने होत होती .
याबाबतीत उपजिल्हा रुग्णालयात चौकशी केली असता रक्त साठा केंद्राला मंजुरी मिळाली असून ते अद्यापपर्यंत चालू झाले नसल्याचे समजते .
या रक्त साठा केंद्रासाठी अन्न व औषध विभागाकडून लवकरात – लवकर पाऊल उचलावे , अशी मागणी जोर धरू लागली आहे . एक वैद्यकीय अधिकारी व एक रक्तपेढी तंत्रज्ञ अशी गरज असल्याचे समजते .








Be First to Comment