Press "Enter" to skip to content

श्री योग सेवा प्रतिष्ठान चे नरेंद्र मालुसरे यांनी मालसई गावी केली 5 बेंचची व्यवस्था

सिटी बेल लाइव्ह । कोलाड । कल्पेश पवार । 🔷🔶🔷

श्रीयोग सेवा प्रतिष्ठान मालसई च्या वतीने झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी श्रीयोग सेवा प्रतिष्ठान चे सदस्य नरेंद्र मालुसरे यांच्या प्रयत्नाने परिसरातील नागरिकांना बसण्या साठी 5 बेंच ची व्यवस्था करण्यात आली.

मालसई पंचक्रोशीतीळ सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे नरेंद्र मालुसरे हे नेहमीच विविध उपक्रम राबवित असतात.नुकताच श्री योग सेवा प्रतिष्ठान मालसई च्या वतीने झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राबविण्यात आला व या झाडांची देखभाल चांगल्या पद्धतीने करण्यात आली आणि ती झाडे मोठी होऊन तिथून येणाऱ्या परिसरातील नागरिकांची निसर्गाच्या सानिध्यात बसण्याची व्यवस्था श्रीयोग सेवा प्रतिष्ठान चे सदस्य श्री. नरेंद्र मालुसरे यांच्या प्रयत्नाने 5 बेंच देऊन करण्यात आली.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित उद्घाटक भारत देश्याच्या सेवेसाठी कार्यरत असलेले दोन जवान मिलिंद चाळके व संदेश आयरे तसेच ह.भ.प. दिनेश महाराज कडवं यांच्या शुभ हस्ते करण्यात आली. यावेळी कार्यकारी मंडळाचे माजी सरपंच व मालसई गावचे अध्यक्ष नथुराम मालुसरे, ग्रामपंचायचे उपसरपंच सुनील मोहिते गावचे सचिव संजय मोहिते.गावचे खजिनदार रविंद्र चाळके जेष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण चाळके मालसई गावचे युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते निलेश मालुसरे . प्रतिष्ठान चे सदस्य, विशाल बामणे . मालसई गावाचे स्वाध्याय दिनेश भाऊ मालुसरे पाणी कमिटी सदस्य शिवाजी मालुसरे,नामदेव शिंदे शुभम मोहिते,चरण मालुसरे,राकेश मालुसरे,रोशन चाळके, सर्व ग्रामस्थ व युवा मंडळ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.