Press "Enter" to skip to content

वाहतुक पोलीसाने कर्तव्यासोबत जपली सामाजिक बांधिलकी

वाहतुक पोलिस संदिप पाटील यांच्या प्रयत्नाने दांड-रसायनी रस्त्यावरील खड्डयांची डागडुजी 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔶🔷🔶

रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील दांड-रसायनी रस्त्याला मोहोपाडा शहराजवळ ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे.या रस्त्यावरून वाहने चालविताना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. यातच वाहतूककोंडी होत असल्याने वाहतूक पोलिसांनाही खूप त्रास होत होता. अखेर वाहतूक पोलीस संदिप पाटील यांच्या प्रयत्नातून दांड-रसायनी रस्त्यावरील मोहोपाडा जनता विद्यालय शाळेच्या वलणावर बॅंक आॅफ इंडिया समोर ,मोहोपाडा प्रवेशव्दार,मोहोपाडा रसायनी रिक्षा थांबा,माणिक प्रबलजवल आदी रस्त्यांची डागडुजी झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दांड-रसायनी रस्त्यावरील मोहोपाडा शहराच्या बाजारपेठेत आसपासच्या भागातील नागरिकांची रेलचेल असल्याने येथील बाजारपेठेला महत्त्व आहे.पावसाल्यात बॅक आॅफ इंडियाच्या शाखेसमोर , माणिक प्रबलजवल,मोहोपाडा प्रवेशव्दाराजवलील रस्त्याची दुरवस्था होवून मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते.

या खड्यात वाहने आदळल्याने अनेकांच्या वाहनांचे नुकसान झाले होते. तसेच अनेक वाहनचालकांना व्याधींनी ग्रासले होते. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याने रसायनी पोलिस ठाण्याचे वाहतूक पोलीस शिपाई संदिप पाटील यांनी माजी सरपंच सुनील सोनावळे यांना सदर समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करावयाची विनंती करताच सोनावळे यांनी सिमेंट खडी काॅक्रीट मालाचे मिश्रण मोहोपाडा रस्त्यांवरील खड्ड्यांत टाकून खड्डे बुजविले.

यावेळी पोलिस मित्र नाना गायकवाड यांनीही परिश्रम घेतले. दांड-रसायनी रस्त्यावरील खड्डे बुजविल्याने वाहनचालक नागरिकांनी वाहतूक पोलिस संदिप पाटील आणि माजी सरपंच सुनील सोनावळे ,प्रणय सोनावले, पोलिस मित्र नाना गायकवाड यांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.