माझे कुटुंब – माझी जबाबदारी या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । भिसेगाव – कर्जत । सुभाष सोनावणे । 🔷🔶🔷
कोरोना विषाणू संसर्ग महामारीपासून नागरिकांची सुरक्षा होऊन नवीन रुग्णांची साखळी तोडण्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन राज्य शासनाने प्रत्येक शहरापासून ग्रामीण भागात ” माझे कुटुंब – माझी जबाबदारी ” हा अनोखा उपक्रम राबविला . त्यामुळे प्रत्येक घरी जाऊन नागरिकांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली . सदरील तपासणी कोरोना आजाराची प्रथमदर्शनी चाचणी असल्याने सर्व नागरिकांना आपण आजारी आहोत की नाही , याची माहिती मिळाली, या प्रोत्साहनपर तपासणीला कर्जतमध्ये सर्व नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला .

माझे कुटुंब – माझी जबाबदारी या मोहिमेत आरोग्य पथक ,आरोग्य कर्मचारी ,नगरपालिकेचे कर्मचारी, शिक्षक, स्वयंसेवक घरोघरी फिरून कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण तसेच इतर आजार असणारे रुग्ण यांची माहिती घेऊन आणि थर्मल स्कॅनिंग तसेच ऑक्सिजन लेवल तपासणीचे काम ६४८७ घरी जाऊन सुमारे २२६०० नागरिकांची तपासणी आजपर्यंत झालेली आहे , त्यामध्ये ३ रुग्ण कोरोना बाधित मिळाले असून त्यांना त्वरीत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले .
नागरिकांना प्रोत्साहन तसेच कर्जत नगर परिषद आपल्या पाठीशी आहे , सर्वांनी तपासणी करून घ्या , हा विश्वास येण्यासाठी या मोहिमेत कर्जत नगर परिषदेच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ . सुवर्णा केतमन जोशी , या सातत्याने प्रत्येक प्रभागात फिरत होत्या , तर त्यांना मुख्याधिकारी डॉ . पंकज पवार – पाटील व उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल तसेच सर्व लोकप्रतिनिधींची साथ लाभली .
त्यामुळे माझे कुटुंब – माझी जबाबदारी ही मोहीम सर्वांच्या सहकार्याने यशस्वी होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने दिसून येत आहे .








Be First to Comment