सिटी बेल लाइव्ह । उरण । प्रतिनिधी । 🔶🔷🔶
कोरोना महामारीचे संकट सुरू झाल्यापासून तहान भूख विसरत घरदार सोडून आपले जीवन कोरोना पेशंटसाठी अर्पित केलेले कोरोना योद्धा समाजसेवक संतोष पवार यांचा वाढदिवस आज साधेपणाने साजरा करण्यात आला.
संतोष पवार यांना अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. संतोष पवार यांनी आज आपल्या वाढदिवसाची सुरुवात सकाळी द्रोणागिरी किल्ल्यावर वृक्षारोपण करून दिवसाची सुरुवात केली. यावेळी पत्रकार विरेश मोडखरकर यांनी छोटेखानी चर्चासत्र घेत कोरोना बाबत जनतेला काय सल्ला द्याल अशी विचारणा करताच त्यांनी विरेशजी तुम्ही व तुमच्या टीमने जो दररोज सकाळी किल्ल्यावर चढणे व उतरणे हा सर्वात चांगला व्यायाम असून कोरोनाच्या महामारीत अशा व्यायामाची नितांत गरज आहे. त्यामुळे आपली प्रतिकार शक्ती नक्कीच वाढण्यास मदत होणार आहे.

त्यामुळे कोरोनावर मात करणे शक्य होईल. तसेच कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी मास्क, स्वच्छता, सोशल डिस्टंट पाळत स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी तसेच आजरपणाचे कोणतेही लक्षण दिसल्यास तात्काळ डाॅक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण सामोरे गेलो तर नक्कीच कोरोनावर मात करू असा सल्ला पवार यांनी जनतेला दिला.
यावेळी संतोष पवार यांनी द्रोणागिरी किल्ल्यावर उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू, एएम न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी विरेश मोडखरकर, दुर्गमावळाचे गणेश तांडेल, संजीव पवार यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण केले. तसेच संतोष पवार यांचे सुपुत्र हर्ष पवार यांनी संतोष पवार यांचे हुबेहूब काढलेले चित्र त्यांना भेट दिले.
त्यानंतर उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पावर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांची काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी सदिच्छा भेट घेतली.

यावेळी त्यांनी संतोष पावर यांना मायेची उबदार शाल देत भावी आयुष्यासाठी शुभआशिर्वाद देऊन त्यांनी भविष्यात असेच सामाजिक कार्य करत राहावे हि इच्छा व्यक्त केली.
यावेळी सोबत शिवसेना नगरसेवक अतुल ठाकूर, सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिनेश घरत उपस्थित होते. संतोष पवार यांना वाढदिवसानिमित्त अनेकांनी शुभेच्छा देत कोरोना सारखे सामाजिक कार्य करण्यासाठी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या.








Be First to Comment