Press "Enter" to skip to content

खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते प्राचार्य रमेश मोसे यांना पुरस्कार प्रदान

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔶🔷🔶

कोकण एज्युकेशन सोसायटीच्या रोहा येथील मेहेंदळेेेे हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक ते प्राचार्य म्हणून यशस्वी मजल मारली आहे. याबरोबरच ते रोहा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, कोकण एज्युकेशन सोसायटी अलिबाग पतपेढी चे संचालक आहेत. त्यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा व शैक्षणिक साधने विविध फाउंडेशन तर्फे उपलब्ध करून दिली. त्यांना गरीब व गरजू विद्यार्थ्यांना प्रति नेहमीच तळमळ असल्यामुळे ते त्यांच्या अडचणीसाठी नेहमीच कार्यतत्पर असतात. आपल्या महाविद्यालयातील खेळाडूंना नेहमीच मदत करत असून ते खेळाडूंना किट्स, युनिफॉर्म, प्रथमोपचार व मार्गदर्शक उपलब्ध करून देतात, त्यामुळे मेहेंदळे हायस्कूलचे विद्यार्थी दरवर्षी जिल्हा व राज्यपातळीवर खो- खो व कबड्डी खेळांमध्ये मजल मारतात. अशाप्रकारे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनने त्यांच्या कार्याची दखल घेऊन नुकताच संपन्न झालेल्या पत्रकार असोसिएशनच्या नवव्या वर्धापनदिनी रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते शैक्षणिक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

यावेळी रायगडच्या पालकमंत्री ना.अदितीताई तटकरे, आ.अनिकेतभाई तटकरे, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विभागीय नेते नरेंद्रशेठ जैन, दिलीपभाई टके, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, मधुकर ठमके, जेष्ठ पत्रकार जयंत धुळप, ठाण्याचे उद्योजक डॉ. जितेंद्र खेर, मनसे जिल्हा संघटक गोवर्धनभाई पोलसानी, पत्रकार असो. चे संस्थापक शामकांत नेरपगार, अध्यक्ष ऍड. महेश पवार, कॉंग्रेस रोहा तालुका अध्यक्ष निजामभाई सय्यद, नागोठण्याचे माजी सरपंच विलास चौलकर, माजी सरपंंच लियाकत कडवेकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, माजी उपाध्यक्ष किशोरभाई म्हात्रे, शेकापचे जेष्ठ कार्यकर्ते नारायण भोईर (गुरुजी), भाजपाचे रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर आदींसह नागोठणे शहर व विभागातील पत्रकार असोसिएशनचे हितचिंतक उपस्थित होते.

पुरस्कार प्राप्त रमेश मोसे यांचे कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय पाटील, शाळा समिती सदस्य, सर्व शिक्षक वर्ग व मित्रपरिवार यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.