Press "Enter" to skip to content

पोलादपूरला एमआयडीसी होण्यासाठी आ.गोगावले यांचेही उद्योगमंत्री देसाई यांना निवेदन

माजी आ.जगताप यांच्या मिनी एमआयडीसीच्या मागणीऐवजी नवीन एमआयडीसीची मागणी 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर । 🔶🔷🔶

पोलादपूर तालुक्यात रोजगार निर्मितीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून एमआयडीसीची मागणी, सरकारची घोषणा आणि शेतकऱ्यांचा विरोध अशा घटनाक्रमांनंतर एमआयडीसी दरवेळी बारगळत असल्याच्या बातमीची दखल घेत महाड विधानसभा मतदार संघाचे आ. भरत गोगावले यांनी उद्योगमंत्री ना.देसाई यांना निवेदन देत तुर्भे खुर्द व वझरवाडी परिसरात नवीन एमआयडीसीची मागणी केली आहे.

यापुर्वी माजी आमदार माणिक जगताप यांनीही याच परिसरामध्ये मिनी एमआयडीसीची मागणी तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांना तत्कालीन सभापती दिलीप भागवत यांच्या निवेदनाद्वारे केली होती.

पोलादपूर तालुक्यात सोशल मिडीयावरून पुन्हा एमआयडीसीच्या मागणीचा पुनरूच्चार सुरू झाल्याचे सविस्तर वृत्त प्रस्तुत प्रतिनिधीने प्रसिध्द करून तालुक्यातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या बेरोजगारांच्या संख्येबाबत लक्ष्य वेधले होते. यानंतर तालुक्यात या बातमीची सांगोपांग चर्चा घडून आली आणि ज्याठिकाणी माजी आमदार माणिक जगताप यांनी मिनी एमआयडीसी उभारण्याची मागणी तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे केली होती. त्याच तुर्भे खुर्द व वझरवाडी परिसरामध्ये नवीन एमआयडीसी उभारण्यासाठी आ.गोगावले यांनी विद्यमान उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांना 5 ऑक्टोबर 2020 रोजी निवेदन देऊन पाठपुरावा केला आहे.

यावर्षाच्या सुरूवातीला 3 मार्च 2020 रोजीच पोलादपूर तालुक्यातील महाड विधानसभा संपर्कप्रमुख सुभाष पवार, पोलादपूर तालुका संपर्कप्रमुख किशोर जाधव आणि विधानसभा समन्वयक राजू रिंगे यांनी विद्यमान उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांना दिलेल्या निवेदनाची प्रत सोशल मिडीयावरून गेल्या महिन्यांत व्हायरल होऊ लागली होती.

या पत्राची दखल घेत एमआयडीसीचे रिजनल ऑफिसर यांनी पत्रव्यवहाराने पाठपुरावा करून पोलादपूर तालुक्यासाठी स्वतंत्र एमआयडीसी सुरू होण्यासाठी डेप्युटी चिफ एक्झीक्युटीव्ह इंजिनियर अंधेरी यांना विशेष आग्रह 4 जून 2020 रोजीच्या पत्राने केला आहे. आता याचसंदर्भात आ.भरत गोगावले यांनीही पाठपुरावा केल्याने रायगडच्या पालकमंत्री ना.अदिती तटकरे या उद्योगराज्य मंत्री असल्याने कोणती भूमिका घेतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.