ज्या दिवशी सयंम सुटेल त्या दिवशी वीज वितरण कार्यालय फुटेल 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । रायगड । धम्मशील सावंत । 🔷🔶🔷
कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्यांचे कंबरडे मोडतील असे अव्वाच्या सव्वा वाढीव वीज बिलांनी सुधागडवासीय जनता प्रचंड त्रस्त झाली आहे. वाढीव वीज देयके आणि विजवीतरणच्या भोंगळ कारभारामुळे जनतेत प्रचंड संताप दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील असंख्य नागरीक व महिलांनी तालुका मनसेकडे धाव घेतली.विजसमस्येवर मनसेने दंड थोपडले.

या सर्व संतप्त नागरीक व महिलांना घेवुन मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनिल साठे यांनी पाली विजवीतरण कार्यालयाला घेराव घातला. वीज वितरण प्रशासन जनतेच्या भावनांशी खेळत आहे, आमचा अधिक अंत पाहू नका अन्यथा मनसेशी गाठ असल्याचे साठे यांनी बजावले.

सुनील साठे व मनसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी पाली विजवीतरणचे कार्यकारी उपअभियंता जतिन पाटिल यांच्यासोबत चर्चा केली. या दोन दिवसांत वाढीव वीज बिलांवर तोडगा काढा अन्यथा मनसे स्वस्थ बसणार नाही, आमचा संयमाचा बांध फुटला तर खळ खट्याक करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी मनसे तालुका अध्यक्ष सुनिल साठे , विभाग अध्यक्ष केवल चव्हाण, उप अध्यक्ष अल्पेश दळवी, परेश वनगले आदी पदाधिकर्यांसह नागरिक उपस्थीत होते.








Be First to Comment