Press "Enter" to skip to content

डाॅ.निकम-परमार हॉस्पिटल कोविड रुग्णांचे मंदिर : अनंता पाटील

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔷🔶🔷

कोरोनाग्रस्त व त्यांचे नातेवाईक यांच्याकडून कोरोना काळातील स्थिती व हॉस्पिटल याबद्दल ऐकुन भीती वाटत होती,पण मी पनवेलच्या निकम-परमार या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन घरी आल्यावर हॉस्पिटल नसून मंदिर असल्याचा भास होतो आहे.असे भिलवले गावचे पोलीस पाटील अनंत ठोंबरे यांनी सांगितले.

अनंत ठोंबरे-पाटील हे गावचे पोलीस पाटील असले तरी ते एक जेष्ठ समाजसेवक असल्याचे तेथील आदिवासी बांधव सांगतात.विवाहित बहिनीवर कोरोनाचे उपचार करत असताना पाटील व त्यांच्या आईला कोरोनाची लागण कधी झाली कळले नाही.त्यांची वैद्यकीय चाचणी पॉझिटिव्ह आली होती,दरम्यान त्यांची तब्येत खालावत गेल्याने अनेक ठिकाणी चौकशी करून रुग्णालय उपलब्ध झाले नाही,शेवटी पनवेल येथील निकम-परमार यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

कोरोना रुग्णांची शाश्वतीच नाही,त्यामुळे घरापासून सगेसोयरे ते मित्रपरिवार काळजीत होते. मी देव पाहिला नाही,पण निकम-परमार यांच्या रूपाने देव पाहिला,हॉस्पिटलमध्ये कसलीही आरडाओरडा नाही,औषधांची चणचण नाही,की पैशासाठी आकांडतांडव नाही,मी कधी,कसा बरा होऊन घरी आलो हे कळलेच नाही,खरच डॉक्टर व त्यांचे सर्व सहकारी हे देवदूतच आहेत,त्यांना नमस्कार करणे मी आदय कर्तव्य समजतो असे भावनिक उद्गार भिलवले गावचे पोलीस पाटील अनंत ठोंबरे पाटील हे घरी सुखरूप आल्यावर त्यांना भेटण्यासाठी आलेल्या प्रत्यकाला ते सांगत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.