Press "Enter" to skip to content

उत्तर प्रदेशच्या पीडित महिलेला न्याय मिळावा : दिशा केंद्राची मागणी

कर्जतच्या उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन सादर

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔷🔶🔷

उत्तर प्रदेश मधील हासरथ मधील पीडित दलित शेतमजूर महिलेस न्याय मिळावा अशी मागणी कर्जत मधील दिशा केंद्राच्यावतीने कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल घेरडीकर यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

कर्जत चे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांची दिशा केंद्राचे अशोक जंगले, वैष्णवी दभडे, सोनाली मोरे, वैजयंती श्रीखंडे, माधूरी कराळे,नेहा कडव, वृषाली देशमूख, उज्जैन शिरसाठे यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. उत्तर प्रदेश हासरथ येथील एका दलित वाल्मिकी समाजातील शेत मजूर कुटुंबातील 19 वर्षीय युवतीचा अमानुषपणे अत्याचार करत मानवी पाचवी पद्धतीने बलात्कार व मारहाण करून खून करण्यात आला ही घटना मानवतेला काळीमा फासणारी व संविधान विरोधी असून भारतीय नागरिक म्हणून आम्ही ह्या घटनेचा जाहीर निषेध करतो.

या निवेदनाद्वारे अशी मागणी करतो की हासरथ येथील गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, खटला जलद गतीने न्यायालयात चालवला जावा, मध्यरात्री पालकांची परवानगी न घेता पीडितेचे प्रत जाळणाऱ्या सरकारचा मानवी हक्क उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा, दलित-आदिवासी हक्क अबाधित राहण्यासाठी पीडितेच्या कुटुंबाला संरक्षण देऊन त्या कुटुंबाचे योग्य पुनर्वसन करावे, अशा घटना परत घडू नयेत यासाठी कोठार कायदा बनवावा, ॲक्ट्रासिटी ॲक्ट प्रभावी अंमलबजावणी व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.