Press "Enter" to skip to content

रमेश वारगुडे यांनी दिले घोरपडीच्या पिल्लाला जिवनदान

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔶🔷🔶

नागोठण्याजवळच असलेल्या सुकेळी येथील जिंदाल रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या वसाहतीमध्ये शिरलेल्या घोरपडीच्या पिल्लाला पकडुन सुखरुप जंगलात सोडुन रमेश वारगुडे यांनी त्या पिल्लाला जिवदान दिले आहे.

यासंदर्भात उपलब्ध माहितीनुसार जिंदाल रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या वसाहतीमध्ये जिंदाल कंपनीतील अनेक कर्मचारी आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत. याच वसाहतीमधिल एच- ४ या वसाहती मध्ये मंगळवारी (दि.६) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वसाहतीमधील नागरीकांना घोरपडीचे पिल्लु पाहण्यात आले. पंरतु तेथील लोकांना हा काहीतरी एक विषारी जातीचा प्राणी असल्याची भिती वाटली व सर्वांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलेे. त्यांनी ताबडतोब गेटवर ड्युटी बजावत असलेल्या सिक्युरिटी गार्डला बोलावुन त्यांच्या मदतीने जिंदाल रुग्णालयात काम करत असलेले रमेश वारगुडे यांनी हा विषारी प्राणी नसुन घोरपड असल्याचे तेथील नागरिकांना सांगत ते घोरपडीचे पिल्लु पकडुन तेथुन जवळच असलेल्या जंगलात सोडुन दिले. त्यानंतर तेथील नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

रमेश वारगुडे हे एक आदिवासी समाजाचे असुनही त्यांनी आपल्या मनामध्ये प्राणी मित्रांबद्दल असलेले प्रेम या घोरपडीच्या पिल्लांला जिवनदान देऊन दाखविले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.