Press "Enter" to skip to content

उजाड डोंगरात “देवदार वृक्षांची” लागवड

सिटी बेल लाइव्ह । उरण । बातमीदार । 🔶🔷🔶

छावा प्रतीष्ठान चिरनेर ने तलाखर डोंगर परिसरात ‘देवदार वृक्षांची” लागवड केली. काही वर्षापूर्वी शासनाच्या विकास कामांमूळे तलाखर डोंगरावरील बरीच वृक्षसंपदा नष्ठ झाली होती.त्या मूळे त्या उजाड झालेल्या भागात केवळ काटेरी जाळ्या निर्माण झाल्या होत्या.तो भाग वृक्षमय करण्यासाठी वृक्षसंवर्धनासाठी प्रसिद्ध असलेली “छावा प्रतीष्ठान चिरनेर” हि संस्था पूढे सरसावली आहे.

संस्थेच्या सभासदांनी प्रथम उजाड झालेल्या भागातील काटेरी जाळी काढून झाडांना जागा निर्माण केली. व नंतर 35 देवदार वृक्षांचे स्टम्स संस्थेकडून लावण्यात आले.या संस्थेचे बहुतेक सदस्य हे शासनाच्या आत्यावश्य सेवेत असतानाही वेळ काढून नुसते वृक्ष लागवड न करता वृक्षसंवर्धन करत आहेत.

यावेळी,सुशिल म्हात्रे,धिरज केणी,तुषार केणी, सचिन केणी,सचिन कडू,सुभाष कडू,निहाल केणी,ऋषिकेश कडू,निहाल केणी,हार्षल केणी हे सदस्य सहभागी झाले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.