सिटी बेल लाइव्ह । उरण । घनःश्याम कडू । 🔷🔶🔷
मंदी … आणि केवळ मंदी. कोरोनामुळे अनेक व्यवसाय, कंपन्या मंदीच्या खाईत लोटल्या गेल्या. याचा थेट परिणाम तेथे काम करीत असलेल्या कामगारांवर झाला आहे.
अनेकांना कामावरुन कमी करण्यात आली आहे. बांधकाम व्यवसायालाही अवकळा आली असल्यामुळे येथे काम करणार्या नाका मजुरांनासुद्धा हाताला काम मिळेनासे झालेय. त्यामुळे हे नाका मजूर दिवसभर अर्धचंद्र भाकरीच्या प्रतीक्षेत कोणी ठेकेदार येईल आणि आपल्याला कामावर नेईल, या आशेने तासन्तास वाट पाहत बसल्याचे केविलवाणे चित्र नजरेस पडत आहे.
ज्या काही लोकांच्या नोकर्या गेल्या किंवा लोकल प्रवासी सेवा बंद असल्याने कंत्राटी कामगारांना कामावर जाणे शक्य होत नाही आणि ज्यांच्याकडे थोडीफार जमापुंजी होती, त्यांनी मनातील संकोच बाजूला सारत मुख्य रत्यांच्या दुतर्फी जमेल ते व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे.
कोणी टीपॉयवर मक्याचे कणस विकायला घेऊन बसलाय, तर कोणी भाज्या, कांदे, बटाटे तर काहींनी कटलरी सामान. मात्र कोरोनाच्या काळात बहुतांश नागरिकांचे खिसे रिकामे झाल्याने खरेदीला जोर नाही. नागरिक जे फारच गरजेचे आहे, तेच माफक प्रमाणात खरेदी करीत आहे. त्यामुळे बहुतांश व्यावसायिकांना दिवस दिवस ग्राहकांच्या प्रतीक्षेत घालवावा लागत आहे.








Be First to Comment