Press "Enter" to skip to content

वाढदिवसानिमित्त गुरुव्दाराला धान्य व खाद्यतेलाची भेट

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔷🔶🔷

कोविड काळात जेव्हा घर गाठण्यासाठी रस्त्यावरून चालणार-या मजुरांची उपासमार सुरू झाली तेव्हा नविन पनवेलच्या गुरूद्वाराने सलग सहा महिने या मजुर आणि इतरांसाठी “लंगर” चालवले. त्यांचे हे कार्य सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.याकरिता मनसेचे तालुकाध्यक्ष अविनाश नारायण पडवळ यांनी गुरूद्वाराच्या कमिटीची भेट घेऊन धान्यासह खाद्यतेलाची भेट दिली.

यावेळी तालुकाध्यक्ष अविनाश पडवळ, पनवेल शहराध्यक्ष पराग बालड यांच्या जन्मदिनानिमित्त गुरूद्वाराला धान्य आणि खादयतेलाही भेट देण्यात आली.यावेली वाटप कार्यक्रमाला सर्व सेलचे पदाधिकारी आणि मनसे सदस्य उपस्थित होते.वाटपप्रसंगी सोशल डिस्टिंक्शनचे पालन करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.