हाथरस येथील पीडित मुलीच्या बलात्कारांना फाशीची शिक्षा द्या — डाॅ.वैशाली पाटील
सिटी बेल लाइव्ह । पेण । राजेश कांबळे । 🔷🔶🔷
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका गरीब समाजातील मुलीवर झालेल्या अमानुष बलात्कार प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी तसेच देशात महिला सुरक्षीत नसल्यामुळे युपी सरकारच्या निषेधार्थ तालुक्यातील महिला विरोधी अत्याचार मंचाच्या वतीने आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून निषेध रॅली काढण्यात आली.
यावेळी बोलतांना डॉ. वैशाली पाटील म्हणाल्या की देशात महिला सुरक्षीत राहिली नाही युपी मध्ये एका गरीब कुटुंबातील मुलीवर अमानुषपणे बलात्कार केला जातो तीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली जाते अशा युपी पोलिस प्रशासनाचा तसेच योगी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो त्यामुळे या सरकारने तात्काळ राजीनामा देऊन या पीडीत मुलीला न्याय देण्यासाठी केंद्र सरकारने फास्टट्रॅक न्यायालयात खटला दाखल करुन बलात्कार प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच पीडित मुलीच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्यात यावे अशी मागणी या मंचाद्वारे करण्यात आली आहे.
या निषेधार्थ रॅलीत सामाजिक कार्यकर्ता डॉ. वैशाली पाटील, ॲड. वैशाली कांबळे, शैला धामणकर,कैसर मुजावर, डॉ.निता कदम, दिपश्री पोटफोडे, राजेश रसाळ, संदिप पाटील, प्रकाश पाटील, निलेश म्हात्रे आदिंसह विविध संघटनेच्या महिला उपस्थित होत्या.








Be First to Comment