Press "Enter" to skip to content

खालापूर तहसिलदार मार्फंत राष्ट्रपतींना पत्र, हाथरस घटनेचा निषेध !

महाराष्ट्र युवक काँग्रेस कमिटीच्यावतीने उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील घटनेचा निषेध 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔷🔶🔷

महाराष्ट्र युवक काँग्रेस कमिटीच्यावतीने उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील घटनेचा निषेध करण्यात आला.

त्यांच्या कुटुंबाच्या व्यथा जाणुन घेण्याकरिता काँग्रेस पक्षाचे नेते तथा खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी वडेरा त्या कुटुंबास भेटण्यासाठी जात असताना एका पुरुष पोलिस अधिकाऱ्यांनी प्रियंका व राहुल गांधी यांच्या अंगाला हात लावून कपडे खेचुन त्यांना धक्काबुक्की केली.

या पोलिसांना त्वरित निलंबित करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रशांत गायकवाड यांनी केली आहे.व हातरस घटनेचा निषेध करत लैंगिक शोषण करुन हत्या करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुका तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देवून करण्यात आली आहे.

या याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव प्रशांत गायकवाड , रायगड जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सागर सुगदरे, खालापुर तालुका एनएसयुआय अध्यक्ष कुणाल जाधव, रसायनी विभाग अध्यक्ष पाटील तसेच युवक कार्यकर्ते अनिकेत जाधव व स्वप्नील पवार हे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.