सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔶🔷🔶
वारणा उद्योग समुहाचे मालक, जनसुराज्य पक्षप्रमुख डॉ.विनयराव कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त वावर्लें (चौक) कातकरीवाडीत कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक दिपक पाटील यांच्यावतीने वाडीत औषधी वनस्पतींची लागवड करुन आदीवासी बांधवांना पाचशेपेक्षा जास्त विविध जातींच्या वृक्षांचे वाटप करण्यात आले.यात सिताफळ,आवला,जाम,बेल,कोरपड,वड,पिंपल आदी वृक्षवाटप करण्यात आले.

यावेळी कानसा वारणा फाउंडेशनचे खजिनदार रामदास पाटील,सुमिता पाटील, भावना पाटील आदी उपस्थित होते.तर कानसा खो-यातील गावांत धान्यासह जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष कृष्णा पाटील,युवा अध्यक्ष महेंद्र पाटील,दिपकृष्ण पतसंस्थेचे मॅनेजर तानाजी पाटील, संपदा कुलकर्णी,प्रकाश पाटील,किरण पाटील, भीमराव पाटील, महेश पाटील,शरद पाटील, विश्र्वास पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक दीपक पाटील यांनी कोरोना पाश्र्वभूमीवर घ्यावयाची खबरदारी यावर आदीवासी बांधवांना माहिती दिली.याप्रसंगी सोशल डिस्टिंक्शनचे तंतोतंत पालन केल्याचे दिसून आले.








Be First to Comment