व्यावसायिकांवर मोठा परिणाम 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔶🔷🔶
मार्च मध्ये कोरोनाने शिरकाव केला आणि अनेक लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना तसेच मोलमजुरी करणाऱ्यांना देशोधडीला लावले ते आज तगायत. अनेकांचे आराध्य दैवत गणपती सण सुद्धा सुना सुना गेला. त्यानंतर आता १७ ऑक्टोबरला घटस्थापना आहे.
या दिवसापासून नऊ दिवस सर्वत्र गरबा नृत्याचा कार्यक्रम असतो. नऊ दिवस तरुण-तरुणी, लहान मुलं अगदी उत्साहाने आपली कला सादर करतात. दरवर्षी या कालावधीमध्ये पावसाचे मोठे सावट असते. तरीसुद्धा दोन-चार दिवस मिळत होते त्यातच सर्वजण गरबा नृत्याची मजा लुटत होते. नऊ दिवस गरबा नृत्याचा कार्यक्रम सादर केला जातो यामध्ये नऊ दिवस वेगवेगळे खाद्यपदार्थ आणून ते उपस्थितांना दिले जातात. त्यामध्ये लहान व्यावसायिकांचा धंदा चांगला व्हायचा. मात्र यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे गरबा नृत्याचा कार्यक्रम कुठेही होणार नसल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला असून अनेक लहान व्यवसायिकांवर परिणाम झाला आहे.
पिढ्यान पिढ्या चालत असलेला हा परंपरिक सण यावर्षी खंडित झाला आहे. जुनी जाणकर माणसे सांगतात की, आमच्या जन्मापासून नाही तर आमच्या पणजोबांच्या काळातही असा महाभयंकर प्रकार कधी घडला नव्हता. कोणते सण साजरे झाले नाहीत असा प्रकार कधीच घडलं नाही. या कोरोनाने आज तगायत अनेकांवर मोठे संकट आणले अनेकांना देशोधडीला लावले. हजारोंना आपले जीव गमवावे लागले आणि अनेकांचे संसार ही मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त केले. अनेक सणांचा आनंद हिरावून घेतला. अशी दहशत या कोरोनाने निर्माण केली आहे. गरबा नृत्याच्या वेळी अनेक ठिकाणी तरुण-तरुणी आणि इतर व्यक्ती एकत्र येऊन आनंद लुटतात. दसऱ्याच्या दिवशी सर्वजण एकत्र येतात तसेच घरोघरी जावून आपट्याची पान देऊन सोनं देण्याचा कार्यक्रम करतात. या वर्षी मात्र असे दिसणार नाही. प्रत्येक जण आप आपल्या घरात राहून जुन्या गोष्टींना उजाळा देणार आहे. एकंदरीत या कोरोनाच्या सावटामुळे सर्वत्र गरबा नृत्यावर मोठे सावट आले असून शुकशुकाट दिसणार आहे.







Be First to Comment