Press "Enter" to skip to content

मुरुड येथे बेटी बचाव बेटी पढाव कार्यक्रमाचे आयोजन

सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन । 🔷🔶🔷

मुरुड येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प तर्फे बेटी बचाव बेटी पढाव या कार्यक्रमाचे आयोजन मुरुड पंचायत समिती सभागृहात करण्यात आले होते.यावेळी मुरुड पंचायत समितीच्या सभापती अशीका ठाकूर यांच्या शुभ हस्ते महात्मा गांधी व सावित्री बाई फुले यांच्या तसबिरीला पुष्प माला अर्पण करण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर मुरुड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत जगताप,ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सुभाष वाणी,मुरुड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय करडे,माजी अध्यक्ष पत्रकार मेघराज जाधव,एकात्मिक बालविकास चे विस्तार अधिकारी संजय शेडगे,पोलीस शिपाई आरती पवार,आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाची प्रस्तावना पर्यवेक्षिका शुभांगी कोतवाल यांनी सांगितले कि, २१ व्य शतकात सुद्धा मुलींना जन्माला येऊ दिले जात नाही.यासाठी च शासनाकडून असे कार्यक्रम राबवून जनजागृती करावी लागत आहे.स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण वाढत आहे.स्त्री भ्रूणाचे संरक्षण करणे खूप आवश्यक आहे.

रूढी व परंपरेत अडकलेला माणूस महिलांनी फक्त चूल व मूल सांभाळावी अशी अपेक्षा करीत आहे.यावर मात करण्यासाठी शासनाने मुलींचे जन्मताच स्वागत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखलेल्या असून त्या पद्धतीने शासकीय पातळीवर कार्यवाही होत असते.

यावेळी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प मुरुड तर्फे मुलीनं विषयी जनजागृती होण्यासाठी निम्बंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुरुड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत जगताप यांनी गर्भ धारणा पूर्व व जन्म पूर्व निदान प्रतिबंधक कायदा १९९४ या विषयी माहिती सांगितली.तसेच मुलीच्या लग्नाचे वय २१ असणे खूप आवश्यक आहे.

त्याच प्रमाणे प्रत्येक मुलगी हि पदवीधर असली पाहिजे.बाळ जन्माला आल्यावर ते रडलेच पाहिजे त्यावरूनच त्याचा बुध्यांक वाढणार आहे.मुलाचे रडणे म्हणजेच त्याचा गोल्डन टाइम समजला जातो अशी माहिती यावेळी जगताप यांनी दिली.

तर यावेळी प्रवीण भगत व जयवंत देंडगे यांची सुद्धा मार्गदर्शन पर भाषणे झाली.
यावेळी मुरुड तहसीलदार कार्यालयातील वरिष्ठ लिपिक प्रेरणा प्रवीण भगत यांनी माझी मुलगी माझा स्वाभिमान या विषयावर सर्वोत्कृष्ठ निंबध लिहून त्यांना मुरुड तालुक्यामधून प्रथम क्रमांक देण्यात येऊन त्यांना मुरुड पंचायत समितीच्या सभापती अशीका ठाकूर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला.यावेळी विविध शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धा सुद्धा घेण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संजय शेडगे यांनी केले सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुवर्ण चांदोरकर,अश्विनी पाटील, विजयता खेऊर,उजवला भाटकर कामिनी म्हात्रे मनीषा ठाकूर आदींनी विशेष मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.