Press "Enter" to skip to content

जेएसडब्ल्यु कंपनीच्या गेट समोर ठेकेदारांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

  • आ. रविशेठ पाटील यांच्या उपस्थितीत ठेकेदारांची कंपनी प्रशासनांबरोबर बैठक 🔶🔷🔶
  • ठेकेदारांच्या हिताचे सकारात्मक निर्णय कंपनी प्रशासन घेणार —अधिकारी आशिष चंद्रा 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । पेण । राजेश कांबळे । 💠🌟💠

पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीमध्ये स्थानिक ठेकेदारांच्या विविध मागण्यांसाठी आज सकाळी कंपनीच्या गेट समोर धायरेश्वर कन्स्ट्रक्शन असोसिएशन संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

या मागण्यांमध्ये ठेकेदारांना दर वाढवून ठेका मिळावा, पेट्रोल दर वाढवून मिळावा, कंपनी परिसरात कामगारांसाठी बांधलेल्या काॅलनीमध्ये स्वच्छता ठेवावी, या परिसरात कोरोना रुग्णांचा खर्च कंपनीने करावा, स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्यात यावे आदि मागण्या मांडण्यात आल्या जेएसडब्ल्यु कंपनी मध्ये या परिसरातील ठेकेदारांची कामे सुरू आहेत मात्र मागिल कितेक वर्ष या ठेकेदारांच्या विविध मागण्यांकडे कंपनी प्रशासन लक्ष देत नसल्याने आजचे गेट बंद आंदोलन करण्यात आले असल्याचे अध्यक्ष संजय जांभळे यांनी सांगितले.

यावेळी आ. रविशेठ पाटील यांनी आंदोलनाला पाठिंबा देऊन तात्काळ कंपनी प्रशासना बरोबर बैठक घेतली या बैठकीत जेएसडब्ल्यू कंपनी प्रशासन अधिकारी आशिष चंद्रा,दिलीप सिन्ना,नारायण बोलबुंडा,आत्माराम बेटकेकर,प्रवीण म्हात्रे तसेच या भागातील धायरेश्वर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष संजय जांभळे,उपाध्यक्ष प्रभाकर म्हात्रे,प्रशांत पाटील,सेक्रेटरी मधुकर पाटील,वडखळ सरपंच राजेश मोकल, अमृत म्हात्रे, वडखळ पोलिस अधिकारी आदिसह युनियनचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी आ. रविशेठ पाटील यांनी सदर कंपनीने स्थानिक ठेकेदारांच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय देण्यात यावा अशा सुचना दिल्या.

ठेकेदारांच्या मागण्यांबाबत जेएसडब्ल्यु कंपनी सकारात्मक निर्णय घेईल
आशिष चंद्रा — वरिष्ठ अधिकारी जेएसडब्ल्यु कंपनी प्रशासन

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.