सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔷🔶🔷
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातंर्गत जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रम सन २०२० /२१ शेती प्रशिक्षण तालुका कृषी अधिकारी तालुका रोहा व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रायगड अलिबाग यांच्या वतीने चिल्हे येथे रोहा कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना शेती विषयक या प्रशिक्षणात विविध माहिती देण्यात आली.
यावेळी तालुका अधिकारी कुमार जाधव
बी वाय हेगडे कृ.प. कोलाड ,जे एल मढवी कृ .प.नागोठणे,एन जी जामकर ,कृषी सहाय्यकदोरगुडे, व सारिका सावंत ,आदी चिल्हे शेतकरी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना रोहा कृषी अधिकारी जाधव व कृषी परीक्षक मढवी यांनी मार्गदर्शन करतांना सांगीतले की शेती बरोबरच शेती पूरक व्यवसाय करावा त्याच बरोबर आपल्या शेत जमिनीची माती परीक्षण करून घेणे गरजेचे आहे.
रायसायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर करा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत विविध पिकांचे लाभ घ्या पशु पालन करून शेण खत निर्माण करा खरिपाचे पीक घेण्याआधी शेतजमिनीची मशागत करणे खूप गरजेचे आहे तसेच उन्हाळी पीक घेतांना देखील तेवढीच काळजी घेतली पाहिजे शेत बांधावर फळ झाडे लावून त्यावर कलम करा त्यातून देखील चांगला उत्पन्न प्राप्त करता येईल त्याच बरोबर विमा योजनेचा व विविध शेती अवजारांचा लाभ घेऊन सुजलाम सुफलाम पीक घेऊन सर्व शेतकरी बांधवांनी प्रगतीचा मार्ग धरून उत्पन्न वाढीस प्रयत्न केले पाहिजे शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेत आपल्या शेत जमिनीत सुधारित पीक घेऊन त्याचा जास्तीच जास्त मोबदला कसा मिळेल या कडे लक्ष केंद्रित करा तसेच शेतकऱ्यांचे विविध गट तयार करून त्या गटांच्या माध्यमातून तुम्ही उत्तम प्रकारे तुमच्या शेतीमाळाला बाजारात भाव मिळवू शकता असा सखोल मार्गदर्शन केले.
तसेच यावेळी प्रगत शेतकरी व माजी सरपंच धनाजी लोखंडे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांना हमी भाव मिळणे गरजेचे आहे भात खरेदी विक्री केंद्र गावो गावी सुरू करा गावागावातून शेतकऱ्यांचा भात खरेदी करण्यात यावा रासायनिक खतांनी शेत जमिनीची धूप झाली माती परीक्षनात काढल्यास कृषी खात्यामार्फत संबधित शेतकरी वर्गाला मदत करण्यास यावी अशी मागणी केली तर उपस्थित शेतकरी मित्रांना गाई बैल या पशूंचा पालन करणे ही गरज आहे कारण त्यांच्या शेणातूनच सेंद्रिय खतांचा वापर आपल्या शेत जमिनीला होऊन भात पिकांचा उत्पन्न वाढीस मदत होऊ शकते असा सल्ला यावेळी दिला.
यावेळी ग्राम पंचायतीचे प्रथम नागरिक रघुनाथ कोस्तेकर,मंगेश लोखंडे,धनाजी लोखंडे, राम महाडिक, दगडू लाडगे, नारायण महाडिक, दामुदर कोंडे, गणेश महाडिक पो पाटील, तुकाराम कोंडे, नथुराम कोंडे, धोंडू लोखंडे, गणपत घायले, सटू महाडिक, मारुती भिवा कोंडे, गणेश महाडिक, कृष्णा कोंडे ,अस्मित महाडिक सह चिल्हे गावातील शेतकरी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
तसेच यावेळी येथील शेतकऱ्यांच्या शेतांची व भात लागवड पिकांची उपस्थित अधिकारी वर्गांकडून पाहणी करून या संदर्भात अधिक माहिती देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.








Be First to Comment