सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । 🔷🔶🔷
रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मेढा या ग्रामपंचायतीचा रायगड जिल्हा परिषेदेची २ कोटीची राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली असून, या योजनेच्या पाणी साठवण टाकीचे भुमिपुजन महात्मा गांधी जयंती स्वच्छता सप्ताहाचे औचित्य साधून मा. सभापती लक्ष्मण महाले, सरपंच, स्नेहा महेंद्र खैरे यांच्या शुभाहस्ते शुभारंभ करुन या योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
या नविन योजनेमुळे मेढा ग्रामपंचायत, भिसे ग्रामपंचायत हद्दितील गावांना शुध्द पिण्याचे पाणी लवकरात लवकर मिळणार असल्याने दोन्ही पंचायतीच्या नागरिकांनी समाधान व्यक्त करुन सरपंच, स्नेहा खैरे व ग्रामपंचायतीना धन्यवाद दिले आहे. सदर पाणी साठवण टाकीची क्षमता १ लाख लिटर आहे. सदर टाकी स्वर्गीय काकासाहेब दांडेकर यांनी दिलेल्या ३ गुंठ जागेत बांधण्यात येणार आहे.
सदर योजनेचे काम लवकरात लवकर पुर्ण करुन या योजनेचे उद्घाटन सोहळा खासदार सुनिल तटकरे, राज्य मंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे, विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा करणार असल्याची माहिती सरपंच, स्नेहा खैरे यांनी पाणी साठवण टाकीसाठी काकासाहेब दांडेकर व दांडेकर कुटुंब यांनी विनामुल्य जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद देऊन त्याच्या दुख:द निधानाबद्दल त्यांना भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण केली.
राष्ट्रीय पेयजल योजनेच्या भुमिपुजन कार्यक्रमासाठी मा. सभापती, लक्ष्मण महाले, सरपंच, स्नेहा महेंद्र खैरे युवानेते, महेंद्र खैरे, मेढा हायस्कुलचे चेअरमेन, भगवान गोवर्धने, तंटामुक्त अध्यक्ष, विलास खांडेकर, मा. सरपंच, दिपक दाईटकर, मा. सरपंच, रमेश रेवाले, मा. सरपंच, विलास उंबरे, ग्रामपंचायत सदस्य, उदय मोरे, सदस्य, रविंद्र जाधव, सदस्य, जगदिश घरट, सदस्या, श्रेजल उंबरे, सदस्या, नम्रता महाले, सदस्या, शेवंती शिद, ग्रामसेवक, अमोल तांबडे, विजय मोरे, जयंता गोवर्धने, प्रदिप घरट, संतोष जवके, चंद्रकांत गोवर्धने, नथुराम महाले, तुकाराम गायकर, हेमंत पोळेकर, नरेश शिद, सुरेश मोहिते, निलेश गोवर्धने, मधुकर पारावे, जगिता गोवर्धने, सुनिता पोळेकर, वैदेही खांडेकर, रागिणी गोवर्धने, छगन लाड याचे सह ग्रामस्थ उपस्थिप होते. उपस्थित स्वागत सरपंच, स्नेहा खैरे व आभार ग्रामसेवक, अमोल तांबडे यांनी मानले.








Be First to Comment