सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान । 🔷🔶🔷
२०२० मध्ये घेतलेल्या जेईई ऍडव्हान्स ऑनलाइन परीक्षेमध्ये सोलापूर येथील ए डी जोशी ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये माथेरान नगरपरिषदे मधील कार्यालय अधीक्षक रणजित कांबळे यांचा मुलगा विनीत कांबळे हा आयआयटी साठी पात्र झाला आहे. त्याबद्दल त्याचे अभिनंदन आणि त्याला पुढील वाटचाली साठी माथेरान मधून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
अत्यंत संयमी अन शांत स्वभावाचा विनीत शाळेत सुरुवातीपासून अभ्यासक्रम मध्ये हुशार असून आजवर अनेक शालेय सांस्कृतिक शैक्षणिक तसेच इतर कार्यक्रमात सुध्दा त्याने पारितोषिके पटकावली आहेत. आपल्या गावाचे नाव तसेच कुटुंबाचे नाव उज्जवल करण्याचा त्याचा मानस असून शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आपले आणि कुटुंबियांचे स्वप्न साकार करण्यासाठी तो प्रयत्नशील असल्याचे विनीतने सांगितले.








Be First to Comment