Press "Enter" to skip to content

माजी सरपंच लियाकतशेठ कडवेकर यांचा खा.तटकरेंच्या हस्ते सत्कार

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔶🔷

नागोठणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच लियाकतशेठ कडवेकर यांची दोन वर्षापूर्वी राष्ट्रीय मानवाधिकार संस्थेच्या कोकण विभाग अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी गेल्या दोन वर्षांत केलेल्या कार्याची दखल घेत तसेच खा. सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली नागोठण्याचे सरपंच, रोहे अष्टमी सहकारी अर्बन बँकेचे संचालक, नागोठणे एज्यकेशन सोसायटीचे सचिव अशा अनेकविध पदांवर काम करतांना गेल्या ३० वर्षामध्ये शेकडो लोकाभिमुख कामे केल्याने नागोठणे विभाग पत्रकार असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या वर्धापन दिन कार्यक्रमात लियाकतशेठ कडवेकर यांचा सत्कार रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी रायगडच्या पालकमंत्री ना.अदिती तटकरे, आ.अनिकेत तटकरे, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विभागीय नेते नरेंद्रशेठ जैन, भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, मधुकर ठमके, ठाण्याचे उद्योजक डॉ. जितेंद्र खेर, मनसे जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी, कॉंग्रेस रोहा तालुका अध्यक्ष निजामभाई सय्यद, नागोठण्याचे माजी सरपंच विलास चौलकर, माजी सरपंंच लियाकत कडवेकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, किशोरभाई म्हात्रे आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.