Press "Enter" to skip to content

कृषी,पशुसंवर्धन सभापती मनवे यांची मुरुडच्या प्रयोगशील शेतकऱ्यांना भेट


शेतकऱ्यांना शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान व कुकुटपालन दुग्धव्यवसाय आर्थिक सुबत्ता प्राप्त करून देतील ! कृषी पशुसंवर्धन सभापती बबन मनवे यांचे प्रतिपादन 🔶🔷🔶


सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन । 🔷🔶🔷

रायगड जिल्हा परिषदेचे कृषी पशुसंवर्धन सभापती बबन मनवे यांच्यासह जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन व कृषी विभागाचे अधिकारी यांनी मुरुड तालुक्यातील पशुसंवर्धन व कृषी विभागाचा कामकाजाचा आढावा शीघ्रे येथे घेण्यात आला. यावेळी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी यांच्या शेतावर व गोठ्यावर प्रत्यक्ष भेट देऊन शेतीतील दुग्धव्यवसाय व शेळीपालन उपक्रमात केलेल्या प्रयोगांची माहिती घेतली. तसेच शेतकरी राजू धनावडे यांच्या गीर गाईच्या फार्मवर जाऊन चारा साक्षरता अभियानाची सुरवात सभापती बबन मनवे यांच्या हस्ते झाली.

यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या वतीने कृषी व पशुसंवर्धन विषयक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी राजिप जिल्हा पशसंवर्धन अधिकारी डॉ. बंकट अर्ले, कृषी विकास अधिकारी लक्ष्मण खुरकुटे,सभापती आशिका ठाकूर, उपसभापती चंद्रकांत मोहिते, गटविकास अधिकारी अनिकेत पाटील, सहायक गटविकास अधिकारी राजेश कदम, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ सुदर्शन पाडावे, कृषी अधिकारी अरुण धिवरे, विस्तार अधिकारी (पंचायत) सुभाष वाणी आदी सह प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

रायगड जिल्हा परिषदेचे कृषी पशुसंवर्धन सभापती बबन मनवे यांनी कृषी व पशुसंवर्धनाचा आढावा घेताना उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले कि, आधुनिक तंत्राचा वापर करून शेती केली पाहिजे.शेतीमधील जमिनीचा कस व कोणते पोषक पीक घेता येईल याचा अंदाज व ताळमेळ शेतकऱ्यांना बांधता आला पाहिजे.क्षेत्र कमी असताना सुद्धा भरगोस पीक घेता आले पाहिजे.पशु संवर्धन करताना शासनाच्या योजनेचा फायदा प्रत्येक शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे रायगड जिल्हा परिषदेच्या अनेक योजना कार्यान्वित असून प्रत्येक शेतऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.पशुसंवर्धन वाढवणे हि काळाची गरज बनली आहे.ग्रामीण भागात विस्तीर्ण जागा व गुरांना आवश्यक अशी वन जमीन आहे पाळीव प्राणी पाळले तर दूध अंडी विकून मोठी आर्थिक प्राप्ती करता येईल.

बकऱ्या व गुरे यांची संख्या वाढली पाहिजे कारण ग्रामीण भागाला जगवण्याचे मुख्य साधन हे पाळीव प्राणी आहेत.आजच्या शेतकऱ्याने शेती बरोबरच कुकुटपालन दुग्धव्यसाय यावर अधिक लक्ष केंद्रित केल्यास आर्थिक सुबत्ता प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मनवे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

तालुक्यातील शेतीची माहिती घेतली. तसेच सभापती मनवे यांनी ईतर अधिकारी यांच्यासह तालुक्यातील प्रगतशील शेतकरी राजू धनावडे व शाहिद दादनाक यांच्या फार्मला भेट देऊन त्याची माहिती सुद्धा जाणून घेतली.यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.