ओढ
माझे मलाच न स्मरले
काय दिले अन् काय उरले..
रंगल्या काळोखाच्या रात्रीत
विचारी मनात काहूर
लागे जीवा हुरहूर..
ओढ माहेरची
जीव अडके एक एकात..
एक तारा वाट पाही
खिडकीशी एकटाच घुटमळत राही.
तो उंबरा वाट पाही
काळजी वेस ओलांडू ना देई
अल्लड वाणी नि डोळ्यात मुसुमुसू पाणी
स्वप्ना सम भासते बालपणीचे अंगण.
आता गं जबाबदारीचे कोंदण..
माय ची आठवण राही पोटात
एक हसू गालात अन्
शब्द गंधाळले अंतरात..
श्रद्धा पाटील-जाधव,
खांदा कॉलनी







Be First to Comment